शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २५.७८ कोटी वितरित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:14 IST

अकोला : यंदाच्या पावसाळ्यात सतत पाऊस आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी दुसऱ्या ...

अकोला : यंदाच्या पावसाळ्यात सतत पाऊस आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात शासनामार्फत प्राप्त झालेला २५ कोटी ७८ लाख ७२ हजार रुपयांचा मदतनिधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शनिवारी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालय स्तरावर वितरित करण्यात आला. उपलब्ध मदतनिधी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ३४ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सतत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, कापूस व तूर इत्यादी पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले. या पार्श्वभूमीवर पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ७२ हजार ४७५ शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासनामार्फत २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. उपलब्ध मदतनिधी डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील ३८ हजार ४५४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. जिल्ह्यातील उर्वरित ३४ हजार २१ शेतकऱ्यांना मदतवाटप करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात शासनाकडून २५ कोटी ७८ लाख ७२ हजार रुपयांचा मदतनिधी ८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदतीची रक्कम जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच मदतीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही तहसील कार्यालयांमार्फत सुरू करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय अशी वितरित

करण्यात आली मदतीची रक्कम!

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतवाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपये मदतीची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयस्तरावर वितरित करण्यात आली. त्यामध्ये अकोला ५ कोटी ६६ लाख ३ हजार रुपये, बार्शिटाकळी १ कोटी ४२ लाख ९५ हजार रुपये, अकोट ५ कोटी १८ लाख २२ हजार रुपये, तेल्हारा ३ कोटी १८ लाख ७ हजार रुपये, बाळापूर ६ कोटी २९ लाख ६९ हजार रुपये, पातूर १ कोटी ६० लाख ३५ हजार रुपये व मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ८६ लाख ८२ हजार रुपये मदतीची रक्कम वितरित करण्यात आली.