शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात २५० जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:19 IST

रॅपिड अँटिजन टेस्टसाठी नागरिकांची गर्दी अकोला: फेब्रुवारी महिन्यापासून शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याचे दिसून आले आहे. कोरोनाची लक्षणे आढळून ...

रॅपिड अँटिजन टेस्टसाठी नागरिकांची गर्दी

अकोला: फेब्रुवारी महिन्यापासून शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याचे दिसून आले आहे. कोरोनाची लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांनी रॅपिड अँटिजन टेस्ट करण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. मंगळवारी मनपाच्या विविध चाचणी केंद्रांमध्ये ७७७ नागरिकांनी रॅपिड चाचणी केली तसेच उर्वरित ३२२ जणांनी आरटीपीसीआर चाचणी केली. संबंधितांचे नमुने चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.

टाळेबंदीतही आंब्याची विक्री

अकोला: कोरोना विषाणूच्या संसर्गाला अटकाव घालण्याच्या उद्देशातून जिल्हा प्रशासनाने १५ मे पर्यंत शहरासह जिल्ह्यात टाळेबंदी लागू केली आहे. यादरम्यान, शहरात पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून येते. तरीही खुले नाट्यगृह ते फतेह अली चौक या मार्गावर हातगाडीवर आंबे विक्री करताना लघु व्यावसायिक दिसून येतात.

शहरात ॲम्बुलन्सला नो एंट्री!

अकोला: जिल्हा प्रशासनाने शहरासह संपूर्ण जिल्ह्यात टाळेबंदी लागू केली आहे. अर्थात या कालावधीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य विभागातील तसेच स्वच्छता व जलप्रदाय विभागातील कर्मचाऱ्यांना मुभा देण्याची गरज असताना पोलिसांकडून नाहक त्रास दिला जात आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, चक्क रुग्णवाहिकेला सुद्धा पोलीस नकार देत असल्याचे समोर येत आहे. या प्रकाराची शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम दखल घेतील का, असा सवाल उपस्थित होत आहे.