शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

२५0 एकरांवरील मशागत ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:31 IST

अंदुरा : येथील शेतशिवारातील शिंगोली व  बाळापूर शेतरस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने शेतरस्त्यालगतच्या २५0 एकरांवरील शेतजमिनीची मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे, परिसरातील शेतकर्‍यांची पिके धोक्यात आली असून, उत्पादन घटण्याची शक्यता आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन शेतरस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.  

ठळक मुद्देशिंगोली, बाळापूर शेतरस्त्यांची दुरावस्थाअंदुरा परिसरातील शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअंदुरा : येथील शेतशिवारातील शिंगोली व  बाळापूर शेतरस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने शेतरस्त्यालगतच्या २५0 एकरांवरील शेतजमिनीची मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे, परिसरातील शेतकर्‍यांची पिके धोक्यात आली असून, उत्पादन घटण्याची शक्यता आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन शेतरस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.  यावर्षी सुरुवातीला मृग नक्षत्रात परिसरातील शेतकर्‍यांनी पेरणी आटोपली होती; परंतु मोक्याच्या क्षणी पुन्हा पावसाने दडी मारल्याने परिसरातील पेरण्या उलटल्या.  त्या अनुषंगाने कर्ज, उसनवारी, व्याजाने पैसे काढून शेतकर्‍यांनी दुबार पेरण्या केल्या. त्यावेळी काही प्रमाणात पाऊस झाल्याने  शेतकर्‍यांच्या शेतातील पिके बहरायला लागली. अशावेळी मशागतीची लगबग सुरू होताच परिसरातील शिंगोली शेतरस्ता व बाळापूर शेतरस्ता पाणखास नाल्याजवळ अत्यंत दयनीय अवस्था झाली. संपूर्ण रस्ता चिखलमय  होऊन या रस्त्याने माणसाला जाता येत नाही. शेतकर्‍यांना सुमारे ६ ते ८ किमी अंतरावरून जाऊन आपल्या शेती मशागतीचे कामे करवून घ्यावे लागते. या शेतकर्‍यांच्या विकट अवस्थेकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी शेतकर्‍यांच्यावतीने करण्यात आली आहे.

पाणखास नाल्यावर पूल बांधण्याची मागणीअंदुरा  शेतशिवारातून वाहणार्‍या पाणखास नाल्याला दरवर्षी पूर येतो. त्यामुळे परिसरातील बाळापूर शेतरस्ता व शिगोली  शेतरस्ता पूर्णपणे चिखलमय होतो. त्यामुळे  या परिसरातील शेतकर्‍यांना  मशागतीसाठी अडथळा होतो. त्यामुळे येथे पूल बांधून शेतकर्‍यांची शेतरस्त्याची समस्या कायमस्वरूपी निकाली काढावी, अशी मागणी होत आहे.

या शेतरस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असल्याने चालणेसुद्धा अवघड झाले आहे. त्यामुळे शेती मशागतीचे कामे खोळंबल्याने शेतातील उत्पादन यावर्षी घटणार आहे.-सुरज बेंडे, शेतकरी अंदुरा