शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २५ शालेय खेळाडू शिष्यवृत्तीस पात्र

By admin | Updated: April 7, 2017 01:03 IST

सन २०१६-१७ करिता जिल्ह्यातील १४ व सन २०१५-१६ करिता ११ असे एकूण २५ शालेय खेळाडू शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.

अकोला: भारतीय शालेय खेळ महासंघ, भोपाळ अंतर्गत सन २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने विविध खेळांच्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या व प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्यात येते. सन २०१६-१७ करिता जिल्ह्यातील १४ व सन २०१५-१६ करिता ११ असे एकूण २५ शालेय खेळाडू शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.निवड झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा शिष्यवृत्तीचे वाटप थेट त्यांच्या बँक खात्यात आॅनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडूस ११,२५० रुपये, द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडूस ८,९५० रुपये आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडूस ६,७५० रुपये आणि सहभागी खेळाडूला ३,७५० रुपये एवढी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंनी आपले सहभाग किंवा प्रावीण्य प्राप्त केलेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत, खेळाडूचे बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स व आधार कार्डची झेरॉक्स १० एप्रिल पूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे जमा करावी, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी दिली. सन २०१६-१७ चे पात्र खेळाडूस्वरू प राजेंद्र इंगळे, ओमकुमार विलास सोळंके, आर्यन भाणवडिया, राज मंगल गवई, तेजल धर्मेंद्र ठाकूर, अक्षय सुनील दांदळे, देवांश अशोककुमार मिश्रा, प्रतीक सुभाष राठोड, अनीश शामवेलु जाधव, साक्षी अरू ण गीते, इशा अजय सारडा, निशांत संजय घोगरे, आदित्य गजानन चौधरी, शिवाजी नागोराव गेडाम.सन २०१५-१६ चे पात्र खेळाडूसंकेत सुधाकर तेलगोटे, तेजस उदय हातवळणे, तन्वी सुधाकर नानोटे, निखिल कैलास चव्हाण, पूनम नारायण कैथवास, मो.राहिल मो.रफिक, सचिन साहेबराव चव्हाण, दिया कैलास बचे, साक्षी उमेश गायधनी, मोनिका किसन बावणे, संकेत मुकूंद देशमुख़.