शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

१० महिन्यांत २३ सापळे, ३६ लाचखोर गजाआड ; अकोला 'एसीबी'ची  कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 15:18 IST

अकोला - अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी गत १० महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्याभरात रेकॉर्ड ब्रेक कारवाया केल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात अ‍ॅन्टी करप्शनने केलेल्या कारवायांमध्ये पोलीस एक नंबरवर आहेत.अकोट उप विभागात १५ हजार रुपयांची लाच घेताना कॉन्स्टेबल व उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यास अटक करण्यात आली. महावितरणच्या दोन कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली.

 - सचिन राऊत 

अकोला - अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी गत १० महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्याभरात रेकॉर्ड ब्रेक कारवाया केल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. केवळ १० महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात व बुलडाणा जिल्ह्यात अकोला एसीबीने २३ सापळे रचले असून, या २३ ठिकाणावरून तब्बल ३६ लाचखोरांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बीडीओ, ठाणेदारांसह वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.लाचखोरीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. जिल्ह्यात अ‍ॅन्टी करप्शनने केलेल्या कारवायांमध्ये पोलीस एक नंबरवर आहेत. तर महसूलचे कर्मचारी दोन नंबरवर आहेत. मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात बलात्कारातील आरोपीला अटक केली. मात्र, आरोपीला घरचे जेवण, पोलीस कोठडीत चांगल्या सोयी-सुविधा देण्याच्या बदल्यात पीएसआयने १ लाख २० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर अकोट उप विभागात १५ हजार रुपयांची लाच घेताना कॉन्स्टेबल व उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यास अटक करण्यात आली. महावितरणच्या दोन कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या अधिकाऱ्यावरही सापळा यशस्वी झाला.१० महिन्यांतील कारवायांवर नजर१. पोलीस विभाग - ६ सापळे - ११ पोलिसांना अटक२.महसूल विभाग - ५ सापळे - १० कर्मचारी अटकेत३. शिक्षण विभाग -३ सापळे -४ कर्मचारी अटकेत४. महापालिका- २ सापळे -३ कर्मचारी अटकेत५. कृषी विभाग - १ सापळे - ३ कर्मचारी अटकेत६. महावितरण - २ सापळे -२ अधिकारी अटकेत क्लास वन पदावरील सहा अटकेतअकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर १० महिन्यांचा कालावधी झालेला आहे. या कालावधीत २३ यशस्वी सापळे रचण्यात आले असून, यामध्ये सहा अधिकारी हे क्लासवन आहेत. एसीबीने ३६ लाचखोरांच्या मुसक्या आवळल्यानंतर या लाचखोरांमध्ये वर्ग १ चे सहा अधिकारी, वर्ग २ चे पाच अधिकारी व वर्ग ३ चे २३ लाचखोरांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्याबाहेर कारवाईत ठाणेदार अटकेतअकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे कारवाई करून बाहेर जिल्ह्याचाही विश्वास संपादन केला आहे. मलकापूर पोलीस ठाण्यातील ठाणेदारासह पीएसआय व कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर अकोला पंचायत समितीच्या लाचखोर बीडीओसह सरपंच पुत्रापर्यंतच्या साखळीतील पाच जणांना अटक केल्याची उल्लेखनीय कारवाई करण्यात आलेली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग