संतोष येलकरअकोला, दि. ३0- सोयाबीन विकलेल्या शेतकर्यांना प्रतिक्विंटल २00 रुपयेप्रमाणे अनुदान वाटप करण्यासाठी जिल्हय़ातील २२ हजार ९२७ शेतकरी पात्र ठरले आहेत. अनुदानासाठी पात्र शेतकर्यांच्या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत २७ मार्च रोजी राज्याच्या पणन संचालकांकडे पाठविण्यात आल्या असून, शेतकर्यांना अनुदान वाटप करण्यासाठी ७ कोटी ५६ लाख ३९ हजार रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात परतीचा जोरदार पाऊस बरसल्याने, अमरावती विभागासह विदर्भात सोयाबीनचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याने, सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना आधार देण्यासाठी सोयाबीन विकलेल्या शेतकर्यांना प्रतिक्विंटल २00 रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत गत २0 जानेवारी रोजी घेण्यात आला. त्यानुसार सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना प्रतिक्विंटल २00 रुपये अनुदान वाटप करण्यासाठी जिल्हय़ातील सोयाबीन विकलेल्या शेतकर्यांच्या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत जिल्हय़ातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून मागविण्यात आल्या होत्या. जिल्हय़ातील सातही कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून प्राप्त झालेल्या सोयाबीन विकलेल्या शेतकर्यांच्या याद्यांची तालुका व जिल्हास्तरीय समितीकडून छाननी करण्यात आली.त्यानुसार जिल्हय़ात सोयाबीन विकलेल्या २२ हजार ९२७ शेतकरी सोयाबीन अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. अनुदानासाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील सोयाबीन उत्पादक शेतकर्यांच्या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत २३ मार्च रोजी राज्याच्या पणन संचालकांकडे पाठविण्यात आल्या आहेत. पात्र अनुदानासाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील शेतकर्यांना अनुदान वाटप करण्यासाठी ७ कोटी ५६ लाख ३९ हजार २७४ रुपये निधीची मागणीही जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत पणन संचालक कार्यालयाकडे करण्यात आली आहे.सोयाबीन अनुदानासाठी जिल्हय़ातील पात्र ठरलेल्या शेतकर्यांच्या याद्या राज्य पणन संचालकांकडे ह्यऑनलाइनह्ण पाठविण्यात आल्या आहेत. अनुदान वाटप करण्यासाठी ७ कोटी ५७ लाख ३९ हजार रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. अनुदानाचा निधी लवकरच प्राप्त होणार असून, अनुदानाची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.-जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक.
सोयाबीन अनुदानासाठी २३ हजार शेतकरी पात्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 01:58 IST