शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अकोट शहरातील  सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीच्या नावावर २१ लाखांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:49 IST

अकोट : अकोट शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अनेक सार्वजनिक शौचालयांची दुुरुस्ती व रंगरंगोटीत जुन्याचे नवे करून २१ लाख रुपयांचा डल्ला पालिकेच्या तिजोरीवर मारण्यात आला आहे.

ठळक मुद्दे अनेक सार्वजनिक शौचालयांची दुुरुस्ती व रंगरंगोटीत जुन्याचे नवे करून २१ लाख रुपयांचा डल्ला पालिकेच्या तिजोरीवर मारण्यात आला आहे.१४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून २१ लाख ६० हजार रुपये खर्च दाखवित कंत्राटदारांकडून नगरपरिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामे करून घेतली आहेत.घराघरांत शौचालये उभारल्याने अकोट नगर परिषदेला सरकारने हगणदरीमुक्त शहर म्हणून घोषित केले आहे.

अकोट : अकोट शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अनेक सार्वजनिक शौचालयांची दुुरुस्ती व रंगरंगोटीत जुन्याचे नवे करून २१ लाख रुपयांचा डल्ला पालिकेच्या तिजोरीवर मारण्यात आला आहे. परंतु या शौचालयांची परिस्थिती ‘जैसे थे’ च आहे.अकोट नगर परिषदेने विविध योजनेंतर्गत लाभार्थींना अनुदान देऊन घरगुती शौचालये बांधून घेतली आहेत. त्यासाठी लाभार्थींजवळून पुरावे घेत टप्प्या-टप्प्याने निधी वितरित केला आहे. त्यामुळे घराघरांत शौचालये उभारल्याने अकोट नगर परिषदेला सरकारने हगणदरीमुक्त शहर म्हणून घोषित केले आहे. मात्र, दुसरीकडे याच्या विपरीत विविध प्रभागातील सार्वजनिक शौचालयांची फार दुरवस्था झाली आहे. आधीच जीर्ण झालेल्या शौचालयांच्या दुरुस्ती व रंगरंगोटीकरिता १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून २१ लाख ६० हजार रुपये खर्च दाखवित कंत्राटदारांकडून नगरपरिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामे करून घेतली आहेत. या कामांमध्ये शिवाजी मार्केटमधील शौचालय, जुना उमरा रस्त्यावरील शौचालय, दखनी फैल येथील शौचालय, शासकीय धान्य गोडावूनजवळील शौचालय, गवळीपुरा येथील शौचालय, डोहरपुरा येथील शौचालय, नगर परिषद मराठी व उर्दू शाळेतील सार्वजनिक शौचालय आदी शौचालयांंचा समावेश आहे. या शौचालयांची पाहणी केली असता नगर परिषदेच्या पैशातून कंत्राटदाराने केलेल्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. रंगरंगोटी व दुरुस्ती करण्यापूर्वी असलेली शौचालयांची स्थिती ‘जैसे थे’च असल्याचे या परिसरातील अनेक नागरिकांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)कोट...शौचालयाची रंगरंगोटी व दुरुस्तीच्या नावावर २१ लाख ६० हजार रुपयांची देयके कंत्राटदाराने पालिकेकडून काढली आहेत. परंतु खर्चाप्रमाणे काम झाले नाही. दुरवस्थेच्या पुराव्यानिशी तक्रार जिल्हाधिकारी व संबंधितांकडे केली आहे. पालिकेच्या बांधकाम अधिकाºयांनी ही कामे सुरू असतानाच पाहणी केली असती तर शौचालयांची परिस्थिती ‘जैसे थे’ राहिली नसती.- महादेवराव सातपुतेसामाजिक कार्यकर्ता, अकोटफोटो

 

टॅग्स :akotअकोट