अकोला जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींना २०.८२ कोटींचा निधी वितरित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 11:04 AM2020-09-21T11:04:00+5:302020-09-21T11:04:21+5:30

२० कोटी ८२ लाख ८ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेने १६ सप्टेंबर जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींना वितरित केला आहे.

20.82 crore funds distributed to 535 gram panchayats in Akola district! | अकोला जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींना २०.८२ कोटींचा निधी वितरित!

अकोला जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींना २०.८२ कोटींचा निधी वितरित!

Next

अकोला : पंधराव्या वित्त आयोगांतर्गत दुसऱ्या टप्प्यात शासनामार्फत प्राप्त झालेल्या २६ कोटी २ लाख ७ हजार रुपयांच्या निधीतून ८० टक्के म्हणजेच २० कोटी ८२ लाख ८ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेने १६ सप्टेंबर जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींना वितरित केला आहे. उर्वरित २० टक्के निधीमधून १० टक्के निधी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांना व १० टक्के निधी जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे.
पंधराव्या वित्त आयोगांतर्गत गत जुलै महिन्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेला २६ कोटी २ लाख ७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. उपलब्ध निधीतून ८० टक्के निधी जिल्हा परिषदमार्फत गत आॅगस्टमध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आणि १० टक्के निधी जिल्ह्यातील पंचायत समित्यांना व १० टक्के निधी जिल्हा परिषदेला देण्यात आला होता. तसेच पंधराव्या वित्त आयोगांतर्गत दुसºया टप्प्यात २६ कोटी २ लाख ७ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. नियमानुसार उपलब्ध निधीतून ८० टक्के म्हणजेच २० कोटी ८२ लाख ८ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदमार्फत १६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सातही तालुक्यातील ५३५ ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला असून, उर्वरित १० टक्के निधी (२ कोटी ६० लाख रुपये) जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांना व १० टक्के निधी (२ कोटी ६० लाख रुपये) जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आला आहे. पंधराव्या वित्त आयोगांतर्गत उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आलेल्या निधीतून, ग्रामपंचायतींकडून पाणीपुरवठा व इतर विकासकामे करण्यात येणार आहेत.

पंधराव्या वित्त आयोगांतर्गत शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीतून ८० टक्के निधी जिल्ह्यातील ग्रामपंचयतींना वितरित करण्यात आला आहे. वितरित करण्यात आलेल्या निधीतून ग्रामपंचायतींकडून गावातील पाणीपुरवठा व इतर विकासाची कामे करण्यात येणार आहेत.
- सौरभ कटियार
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

 

Web Title: 20.82 crore funds distributed to 535 gram panchayats in Akola district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.