शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या खात्यात २०.८२ कोटी जमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 10:42 IST

उपलब्ध निधीच्या ८० टक्के २० कोटी ८२ लाख ८ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा करण्यात आला.

अकोला : पंधराव्या वित्त आयोगांतर्गत शासनामार्फत उपलब्ध २६ कोटी २ लाख ७ हजार रुपयांच्या निधीचे वितरण सोमवारी जिल्हा परिषदमार्फत करण्यात आले. त्यामध्ये उपलब्ध निधीच्या ८० टक्के २० कोटी ८२ लाख ८ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा करण्यात आला.जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध विकास कामांसाठी पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत २६ कोटी २ लाख ७ हजार रुपयांचा निधी शासनामार्फत गत महिन्यात जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता. नियमानुसार उपलब्ध निधीतून ८० टक्के निधी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना, १० टक्के निधी जिल्ह्यातील पंचायत समित्यांना आणि १० टक्के निधी जिल्हा परिषदेला वितरित करणे आवश्यक आहे. त्यानुसार पंधराव्या वित्त आयोगांतर्गत उपलब्ध निधीचे वितरण १७ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले. त्यामध्ये उपलब्ध निधीच्या ८० टक्के म्हणजेच २० कोटी ८२ लाख ८ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करण्यात आला. उर्वरित १० टक्के २ कोटी ६० लाख २६ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांना आणि १० टक्के २ कोटी ६० लाख २६ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आला. ग्रामपंचायतींचे क्षेत्रफळ व लोकसंख्येचे प्रमाण विचारात घेऊन जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विकासमांसाठी पंधराव्या वित्त आयोगांतर्गत निधीचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या आदेशानुसार निधीचे वितरण करण्यात आले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत