शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्धर आजारग्रस्तांवर २० पथके ठेवणार ‘वॉच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 10:04 IST

जिल्हा प्रशासनामार्फत २० पथके गठित करण्यात आली असून, दुर्धर आजारग्रस्तांवर ‘वॉच’ ठेवण्याचे काम लवकरच या पथकांमार्फत सुरू करण्यात येणार आहे.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी अकोला शहरातील दुर्धर आजारग्रस्तांच्या आरोग्याची दररोज विचारपूस करून, त्यांच्यावर लक्ष (वॉच ) ठेवण्याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत २० पथके गठित करण्यात आली असून, दुर्धर आजारग्रस्तांवर ‘वॉच’ ठेवण्याचे काम लवकरच या पथकांमार्फत सुरू करण्यात येणार आहे.अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, महानगरपालिका प्रशासनामार्फत शहरातील घरोघरी नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामध्ये १८ जूनपर्यंत ७७ हजार १३३ कुटुंबांच्या आरोग्य तपासणीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी दुर्धर आजारग्रस्तांच्या आरोग्यावर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने आरोग्य तपासणीच्या सर्वेक्षणात आढळून आलेल्या मधुमेह, रक्तदाब व आॅक्सिजनचे प्रमाण कमी असणे इत्यादी दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत महानगरपालिका व महसूल कर्मचाऱ्यांची २० पथके गठित करण्यात आली आहेत.

दुर्धर आजारग्रस्तांची संख्या!अकोला शहरात १८ जूनपर्यंत करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीच्या सर्वेक्षण अहवालानुसार शहरात मधुमेहग्रस्त ४ हजार ९०,रक्तदाबग्रस्त ५ हजार ८९ आणि आॅक्सिजनचे प्रमाण ८५ टक्क्यापेक्षा कमी असणारे ३५८ अशी दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींची संख्या आहे.

शहरातील दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींच्या आरोग्यासंदर्भात नियमित विचारपूस करून, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी महानगरपालिका व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची २० पथके गठित करण्यात आली आहेत.-संजय खडसेनिवासी उप-जिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य