शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

विदर्भात महावितरणची कारवाई; ३ दिवसांत २ कोटींची वीज चोरी उघडकीस

By atul.jaiswal | Updated: January 22, 2018 16:59 IST

अकोला : वीज चोराविरूध्द आक्रमक भूमिका घेत महावितरणने १८, १९ व २० जानेवारी रोजी सलग तीन दिवस विदर्भातील बाराही मंडलात वीज चोरांविरुद्ध राबविलेल्या मोहीमेत सुमारे २० लाख ५७ हजार ४८४ युनिट वीजचोरीची आणि अंदाजे २ कोटी ४ लाख ८५ हजार रुपये मुल्याच्या २०६७ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली.

ठळक मुद्देविदर्भातील बाराही मंडलात १८, १९ व २० जानेवारी रोजी सलग तीन दिवस राबविली मोहिम.२० लाख ५७ हजार ४८४ युनिट वीजचोरीची आणि अंदाजे २ कोटी ४ लाख ८५ हजार रुपये मुल्याच्या २०६७ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली.यात ११०१ ठिकाणी थेट मीटरमधून तर ९६६ ठिकाणी वीज तारांवर आकडे टाकून वीजचोरी होत असल्याचे आढळुन आले.

अकोला : वीज चोराविरूध्द आक्रमक भूमिका घेत महावितरणने १८, १९ व २० जानेवारी रोजी सलग तीन दिवस विदर्भातील बाराही मंडलात वीज चोरांविरुद्ध राबविलेल्या मोहीमेत सुमारे २० लाख ५७ हजार ४८४ युनिट वीजचोरीची आणि अंदाजे २ कोटी ४ लाख ८५ हजार रुपये मुल्याच्या २०६७ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. यात ११०१ ठिकाणी थेट मीटरमधून तर ९६६ ठिकाणी वीज तारांवर आकडे टाकून वीजचोरी होत असल्याचे आढळुन आले असून, दोषींवर तडजोड शुल्काची आकारणी न करता थेट गुन्हे दाखल करण्याच्या सुचना प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सर्व संबंधितांना दिल्या आहेत.या मोहीमेत संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्या. यासाठी सुमारे ४०० कर्मचाºयांची ९० पथके गठीत करण्यात आली होती. या मोहिमेत ११०१ ग्राहक थेट विजचोरी करत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरूध्द विद्युत कायदा १३५ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय अभिनव पद्धतीने वीजचोरी करणारा सुत्रधार आणि वीजजमीटर सोबत छेडछाड करणाºया विरुद्ध कलम १३८ नुसार कठोर कारवाई केल्या जाणार आहे.या मोहिमेत विदभार्तील बाराही मंडलातील १००१ ग्राहक मीटरमधून थेट वीज चोरी करत असल्याचे आढळून आले. यामध्ये नागपूर शहर मंडलातील १४, नागपूर ग्रामिण मंडलातील ९२, वर्धा ४३, अमरावती २१८, यवतमाळ ७५, अकोला ८४, वाशिम ११०, बुलढाणा २८७, चंद्रपूर ५९, गडचिरोली ५१, भंडारा ५७, आणि गोंदीया मंडलातील ११ वीजचोºयांचा समावेश आहे. याशिवाय वीज तारांवर थेट आकडे टाकून वीजचोरी करणाºया सोबतच वीजेचा अनधिकृत वापर करणाºया एकूण ९६६ अशा एकूण २०६७ ग्राहकांवर महावितरणतर्फे कारवाई करण्यात येत आहे.वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून या पुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने सामुहिकरित्या दरमहा आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. ग्राहकांनी वीजचोरी व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी केले आहे.अकोला परिमंडळात पकडल्या ४८१ वीज चोऱ्या महावितरणच्या अकोला परिमंडळातही आकस्मीक मोहिम राबविण्यात आली. परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या मंडळांमध्ये सलग तीन दिवस मोहिम राबविण्यात येऊन तब्बल ४८१ ठिकाणी वीजचोरी उघडकीस आणली. यामध्ये अकोला ८४, वाशिम ११०, बुलढाणा २८७ वीज चोरी पकडण्यात आल्या.

टॅग्स :Akola cityअकोला शहरmahavitaranमहावितरण