शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राज्यातील १९५ लाचखोरांवर शासन मेहेरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 13:52 IST

लाचखोरांवर संबंधित विभागाने अद्यापही निलंबनाची कारवाई केली नसल्याने शासनच या लाचखोरांवर मेहेरबान झाल्याचे वास्तव आहे.

- सचिन राऊत

अकोला: शासन दरबारी अडलेले कामकाज करण्यासाठी सामान्यांना लाच मागणाºया १९५ लाचखोरांच्या तक्रारीनंतर राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या १९५ लाचखोरांना रंगेहाथ तसेच रेकॉर्डिंगवरून अटक केली; मात्र या लाचखोरांवर संबंधित विभागाने अद्यापही निलंबनाची कारवाई केली नसल्याने शासनच या लाचखोरांवर मेहेरबान झाल्याचे वास्तव आहे.राज्यातील ८ परिक्षेत्रातील एक हजारावर लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. यामधील तब्बल १९५ लाचखोरांचे निलंबन करण्यात आलेले नाही. या लाचखोरांना शासनच पाठीशी घालत असल्याने संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच लाचखोरांना अभय देण्यासाठी संमती असल्याचे दिसून येत आहे. १ जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत तब्बल १९५ लाचखोरांचे निलंबन न केल्यामुळे लाचखोरांची हिंमत आणखीच वाढत असल्याचेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या आक डेवारीवरून समोर येत आहे. या लाचखोरांमध्ये सुमारे २३ लाचखोर हे क्लास वनचे अधिकारी आहेत. ५० लाचखोर हे वर्ग ३ चे कर्मचारी असल्याचे वृत्त आहे. २३ क्लास वन अधिकाºयांना अभयराज्याच्या विविध शासकीय सेवेतील लाचखोर असलेल्या २३ क्लास वन अधिकाºयांना मोठ्या रकमेची लाच घेताना राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मोठ्या शिताफीने तसेच हिमतीने अटक केली; मात्र संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या लाचखोरांचे काळे कारणामे झाकण्यासाठी त्यांचे अद्यापही निलंबन केले नाही. वर्ग २ च्या २३, वर्ग ३ च्या ९२ लाचखोरांचेही अद्याप निलंबन झालेले नाही. वर्ग ४ च्या ७ तर इतर लोकसेवक असलेल्या ५० जणांचे निलंबन बाकीच आहे. खटले चालविण्यात गतीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे खटले आधी केवळ जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्यात येत होते; मात्र काही दिवसांपासून एसीबीचे खटले आता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्यात येत असल्याने लाचखोरांना शिक्षा होण्याचे किंवा ते निर्दोष होण्याचे खटले गतीने मार्गी लागत आहेत. यामुळे जिल्हा व सत्र न्यायालयाचा ताणही कमी झाला आहे. दोषसिद्धीमुळे शिक्षेचे प्रमाण वाढले!लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास करण्यासाठी दोषसिद्धी प्रणाली अमलात आणली. त्यामुळे आरोपींना कायद्यातून सुटण्याच्या वाटा कमी झाल्या. याचेच फलीत म्हणून १ जानेवारी २०१९ ते आजपर्यंत लाच स्वीकारलेल्या ६२ लाचखोरांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. यामध्ये १२ लाचखोर हे क्लास वन अधिकारी आहेत. ०७ लाचखोर वर्ग २, ३४ लाचखोर वर्ग ३ चे कर्मचारी आहेत. तर २ लाचखोर वर्ग ४ चे कर्मचारी असून, शासन सेवेत नसलेल्या ५ लाचखोरांनाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

निलंबन न केलेल्यांची परिक्षेत्रनिहाय आकडेवारीपरिक्षेत्र आकडेवारीमुंबई २५ठाणे १४पुणे १५नाशिक ०६नागपूर ३४अमरावती २२औरंगाबाद ३०नांदेड ४९-----------------------------

 

टॅग्स :AkolaअकोलाBribe Caseलाच प्रकरण