शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

काटेपूर्णा धरणात उरला १९ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:32 IST

अकोला: पावसाळा सुरू होऊन एक महिना २१ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पावसाळा सुरू होऊन एक महिना २१ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. अकोला शहराची तहान भागविणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणात शुक्रवारपर्यंत १९.०९ टक्के जलसाठा उरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ होण्यासाठी सार्वत्रिक दमदार पाऊस बरसण्याची प्रतीक्षा केली जात आहे. यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन एक महिना २१ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नसल्याने, जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात अद्याप वाढ झाली नाही. गत २० दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाने गत १९ जुलै रोजी जिल्ह्यात दमदार हजेरी लावली; मात्र या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली नाही. त्यामुळे वान धरण वगळता जिल्ह्यातील इतर धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याची स्थिती आहे. त्यामध्ये अकोला शहरासह ६४ खेडी खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा आणि मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणात २१ जुलै रोजी १९.०९ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याचे चित्र आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ होण्यासाठी धरणांच्या जलग्रहण क्षेत्रात दमदार पाऊस बरसण्याची प्रतीक्षा केली जात आहे.