शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

अकोल्यात आणखी १९ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या १३६१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 11:40 IST

शुक्रवार, २६ जून रोजी आणखी १९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देशुक्रवारी सकाळी १५५ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. आठ महिला व ११ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. २९७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची आणि बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवार, २६ जून रोजी आणखी १९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १३६१ झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत ९९० जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत २९७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी सकाळी १५५ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित १३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात आठ महिला व ११ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यातील पाच जण  अकोट फैल येथील, तीन जण गुलजारपुरा येथील, तीन जण लाडीस फैल,  दोघे हरिहर पेठ येथील तर उर्वरित राधाकृष्ण प्लॉट,  आंबेडकरनगर, कमलानेहरू नगर,  तारफैल,  इंदिरा कॉलनी, गाडगेनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.७४ जणांचा मृत्यूकोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ७४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताच्या आत्महत्येचाही समावेश आहे. आतापर्यंत एकूण ९९० जण कोरोना आजारातून बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता २९७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्राप्त अहवाल-१५५पॉझिटीव्ह अहवाल-१९निगेटीव्ह-१३६एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १३६१मयत-७४ (७३+१)डिस्चार्ज-९९०दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-२९७

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या