शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

१८७९ सिंचन विहिरींचा होणार पंचनामा!

By admin | Updated: June 4, 2016 02:20 IST

अकोला जिल्हाधिका-यांचा चारही एसडीओंना आदेश.

संतोष येलकर / अकोलामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात गत वर्षभराच्या कालावधीत करण्यात आलेल्या सिंचन विहिरींच्या कामांची तपासणी करून पंचनाम्यासह वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी १ जून रोजी जिल्ह्यातील चारही उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांना दिला. त्यानुसार जिल्ह्यातील १ हजार ८७९ सिंचन विहिरींच्या कामांचा पंचनामा महसूल विभागाच्या पथकांकडून करण्यात येणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे केली जातात. मंजूर करण्यात आलेल्या विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकर्‍यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्य आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार, अकोला जिल्ह्यात मेअखेर करण्यात आलेल्या सिंचन विहिरींच्या कामांपैकी किती बोगस आहेत, सिंचन विहिरी गायब करण्यात आल्या काय, विहिरींचे काम न करता त्या कागदोपत्री दाखवून अनुदानाची रक्कम काढण्यात आली काय,अनुदान आणि मजुरी रकमेचे वाटप करण्यात आले की नाही, याबाबत तपासणी होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मे २0१६ अखेर वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात करण्यात आलेल्या १ हजार ८७९ सिंचन विहिरींच्या कामांची तपासणी महसूल अधिकारी-कर्मचार्‍यांच्या पथकांकडून करण्यात येणार आहे. या तपासणीत सिंचन विहिरींच्या कामांचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या चार उपविभागीय अधिकार्‍यांना १ जून रोजी दिला. विहिरींच्या कामांचे पंचनामे ७ जूनपर्यंत पूर्ण करून, पंचनाम्यासह अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी अकोला, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर उपविभागीय अधिकार्‍यांना दिला.