शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ १८३ मुला-मुलींना मदतीचे ‘कवच’ : दरमहा ६00 रुपयांचे अनुदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 01:51 IST

अकोला : आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या १८ वर्षाआतील जिल्ह्यातील अनाथ १८३ मुला-मुलींना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमहा प्रत्येकी ६00 रुपये अनुदानाच्या मदतीचे ‘कवच ’ देण्यात आले आहे.

ठळक मुद्देअनुदान तोकडे; उपजीविकेचा प्रश्न!

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या १८ वर्षाआतील जिल्ह्यातील अनाथ १८३ मुला-मुलींना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमहा प्रत्येकी ६00 रुपये अनुदानाच्या मदतीचे ‘कवच ’ देण्यात आले आहे.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत आई-वडील नसलेल्या १८ वर्षाआतील अनाथ मुले व मुलींनी दमहा ६00 रुपये अनुदान दिले जाते. जिल्ह्यातील सातही तालुक्यात आई-वडील नसल्याने नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीकडे राहणारी १८३ अनाथ मुले-मुली आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत या अनाथ मुला-मुलींची संजय गांधी निराधार योजनेंतर्गत निवड करण्यात आली असून, दरमहा प्रत्येकी ६00 रुपयांच्या अनुदानाची रक्कम अनाथ मुले -मुलींच्या बँक खात्यात जमा केली आहे. शासनाच्या योजनेत दरमहा ६00 रुपयांची मिळणारी  मदत  जिल्ह्यातील अनाथ १८३ मुला-मुलींना दैनंदिन खर्च भागविण्यासाठी आधार ठरत आहे.  

अनुदान तोकडे; उपजीविकेचा प्रश्न!आई-वडील नसलेल्या मुले-मुलींना संजय निराधार योजनेंतर्गत दरमहा ६00 रुपयांचे अनुदान शासनामार्फत देण्यात येते; मात्र महागाईच्या काळात महिनाभरात उपजीविका करण्यासाठी देण्यात येणारे अनुदान अत्यंत तोकडे आहे. त्यामुळे मिळणार्‍या अनुदानाच्या ६00 रुपयांत उपजीविका कशी करणार, असा प्रश्न अनाथ मुले-मुलींना सतावणारा आहे.

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत जिल्ह्यात आई-वडील नसलेल्या अनाथ १८३ मुला-मुलींना दरमहा ६00 रुपयांप्रमाणे अनुदान वाटप करण्यात येत आहे. अनुदानाची रक्कम दरमहा संबंधित अनाथ मुला-मुलींच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.- पी.व्ही. गिरीतहसीलदार (संजय गांधी निराधार योजना), जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीण