शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात १७९ तक्रारी; निपटारा करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 18:53 IST

अकोला :   पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या  जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून, सोमवार १६ एप्रिल रोजी झालेल्या जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण १७९ तक्रारी प्राप्त झाल्या.

ठळक मुद्दे प्रारंभी पालकमंत्री यांनी मागील  जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींचा  आढावा घेतला. अुनपालनाची प्रत आपल्याला व संबंधित तक्रारदाराला वेळेत देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले.

अकोला :   पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या  जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून, सोमवार १६ एप्रिल रोजी झालेल्या जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण १७९ तक्रारी प्राप्त झाल्या. सर्व विभागप्रमुखांनी जनतेच्या तक्रारींचा १५ दिवसांच्या आत निपटारा करावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. जनता दरबाराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात  करण्यात आले होते.            यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामुर्ती, मनपाचे आयुक्त जितेंद्र वाघ, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी  राजेश खवले, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी उज्वल चोरे आदींसह विविध विभागांचे  विभागप्रमुख उपस्थित होते.

            नवीन तक्रारकर्त्यांना 15 दिवसांत आपल्या तक्रारीवर कार्यवाही होवून त्याबाबत कळविण्यात येईल, असा दिलासा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी  तक्रार कर्त्यांना दिला.  प्रारंभी पालकमंत्री यांनी मागील  जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींचा  आढावा घेतला. या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती अधिकाºयांकडून त्यांनी जाणून घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे. तक्रारीवर काय कारवाई केली. याबाबतच्या अुनपालनाची प्रत आपल्याला व संबंधित तक्रारदाराला वेळेत देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले. तसेच पालकमंत्री म्हणाले की, प्रशासनाकडून समस्या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असते तक्रार प्राप्त झाल्यावर त्याबाबतची  प्राथमिक माहिती घेवूनच  अधिका-यांनी जनता दरबारात उपस्थित राहावे,  असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Akolaअकोला