अकोला: पोलीस मुख्यालयातील जास्तीत जास्त तसेच जिल्हय़ातील १७४ पोलीस कर्मचार्यांच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी बदल्या करण्यात आल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी मंगळवारी पोलीस कर्मचार्यांच्या बदल्याचे आदेश दिले आहेत. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्यांना जिल्हय़ातील प्रत्येक पोलीस स्टेशनममध्ये बदली देण्यात आली असून, पोलीस स्टेशनमध्ये संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षकांनी केला आहे. जिल्हय़ातील १७४ पोलीस कर्मचार्यांच्या या बदल्या असून, यामध्ये १२२ पोलीस कॉन्स्टेबल, १७ पोलीस नाईक व २८ महिला पोलीस कर्मचार्यांचा समावेश आहे. शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ८ ते १0 पोलीस कर्मचारी वाढविण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी मंगळवारी या पोलीस कर्मचार्यांच्या बदल्या केल्या असून, त्यांना लवकरच संबंधित पोलीस स्टेशनमध्ये रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
१७४ पोलीस कर्मचा-यांच्या बदल्या
By admin | Updated: March 16, 2016 08:38 IST