शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

मास्क, सॅनिटायझर खरेदीवर १.७० कोटी रुपयांचा खर्च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 10:16 IST

मास्क व सॅनियटायझर खरेदीवर १ कोटी ७० लाख ४८ हजार १५१ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनांकरिता जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) प्राप्त ३ कोटी ६१ लाख रुपयांच्या निधीतून जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजनांवर ८ जुलैपर्यंत २ कोटी २३ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून, त्यामध्ये प्रामुख्याने मास्क व सॅनियटायझर खरेदीवर १ कोटी ७० लाख ४८ हजार १५१ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांकरिता जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषद आरोग्य विभागाला ३ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्र, १७८ आरोग्य उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आशा स्वयंसेविकांना मास्क, सॅनियटाझर तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना गावांमध्ये फवारणीसाठी सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशन, प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप आदी उपाययोजनांवर जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ८ जुलैपर्यंत २ कोटी २३ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने मास्क व सॅनिटायझर खरेदीवर १ कोटी ७० लाख ४८ हजार १५१ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या ई-गव्हर्मेंट मार्केटिंग पोर्टलद्वारे मास्क व सॅनिटायझरची खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली.

१४ रुपये ८२ पैसे दराने ६.२७ लाख ‘मास्क’ची खरेदी!जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत १४ रुपये ८२ पैसे दराने ९२ लाख ९२ हजार १४० रुपयांच्या निधीतून ६ लाख २७ हजार ‘ट्रीपल लेअर मास्क’ची खरेदी करण्यात आली. त्यापैकी ६ लाख मास्क जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचारी आणि जिल्हा परिषद विभागप्रमुखांना वितरित करण्यात आले असून, २७ हजार मास्क आरोग्य विभागाकडे सद्यस्थितीत जमा आहेत.

सॅनिटायझर खरेदीवर ७७.५६ लाख खर्च!जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ७७ लाख ५६ हजार ११ रुपयांच्या निधीतून सॅनिटाझर खरेदी करण्यात आले. त्यामध्ये १०० मिलिलीटर प्रती बॉटल ४३ रुपये दराने ३६ हजार ३९० बॉटल सॅनिटाझर खरेदीवर १५ लाख ८२ हजार ९६५ रुपये आणि ५०० मिलिलीटर प्रती बॉटल २२४ रुपये ७० पैसे दराने २७ हजार १८० बॉटल सॅनिटायझर खरेदीवर ६१ लाख ७३ हजार ४६ रुपये खर्च करण्यात आला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला