शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

कुरूम परिसरातील १७ कामगारांची तेलंगणातून केली सुटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 2:06 AM

मूर्तिजापूर: एका अनोळखी व्यक्तीने कुरूम परिसरातील १७ कामगारांना रोजगार देण्याचे आमिष दाखवून तेलंगणातील उदनूर गावात नेले. तेथे त्यांचे वेठबिगाराप्रमाणे शोषण करण्यात येत असल्याच्या माहितीवरून माना पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तेलंगणातून त्या १७ कामगारांची सुटका करून २५ डिसेंबरला त्यांच्या घरी पोहोचवून दिले.  

ठळक मुद्देमाना पोलिसांची यशस्वी कामगिरी रोजगार देण्याचे आमिष दाखवून तेलंगणातील उदनूर गावात नेले होते

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: एका अनोळखी व्यक्तीने कुरूम परिसरातील १७ कामगारांना रोजगार देण्याचे आमिष दाखवून तेलंगणातील उदनूर गावात नेले. तेथे त्यांचे वेठबिगाराप्रमाणे शोषण करण्यात येत असल्याच्या माहितीवरून माना पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तेलंगणातून त्या १७ कामगारांची सुटका करून २५ डिसेंबरला त्यांच्या घरी पोहोचवून दिले.   मनोहर चव्हाण असे नाव सांगणार्‍या एका अनोळखी व्यक्तीने  १८ डिसेंबर रोजी कुरूम परिसरातील गावांमधील १७ कामगारांना रोजगार देतो, असे खोटे आमिष देऊन तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्याच्या जहिराबाद तालुक्यातील उदनूर गावात नेले. तेथे त्यांना खोलीत डांबून ठेवण्यात आले. तेथील एल.आर. रेड्डी यांच्या शेतात त्यांना कठीण कामे करावयास लावले. त्यांना एकच वेळचे जेवण देण्यात येत होते. कामानंतर कोठडीसारख्या घरात कैद्यांसारखे ठेवण्यात येत होते. त्यापैकी एका कामगाराने कुरूम गावातील सुभाष काळे यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली.  काळे यांनी मानाचे ठाणेदार भाऊराव घुगे यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार त्यांना सांगितला. ठाणेदार घुगे यांनी या प्रकाराची स्टेशन डायरीत नोंद केली. त्यानंतर घुगे यांनी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांना याबाबत सांगितले. कलासागर यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक तयार करून उदनूरला पाठविले. त्या विभागातील पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून त्यांची मदत घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार भाऊराव घुगे, पो.हे.कॉ. बाळकृष्ण नलवाडे, नंदकिशोर सुळे, अजय माहुरे यांनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. 

कैद्यासारखे ठेवले होते बंदिस्तउदनूरमध्ये एका घरात कैद्यांसारखे बंद ठेवलेल्या आशीष टाले, पंकज सोळंके, प्रफुल्ल कपिले, भूषण काळे, प्रदीप तिडके, पिंटू  शिरभाते, शेखर ऊर्फ पिंटू इंगोले, नीलेश इंगोले, मोहन सरदार, अजय इंगोले, सुधाकर इंगोले, जीवन इंगोले, विजय इंगोले, अतुल सोळंके, अन्नपूर्णा जोगदंड, डिगांबर जोगदंड व संतोष वानखडे या १७  कामगारांची माना पोलिसांनी सुटका करून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविले. 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूर