शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत अकोल्यात १६६ हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची ‘टू डी ईको’ चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 18:59 IST

शिबिरात १६६ हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची टू डी ईको चाचणी करण्यात आली. यापैकी ७८ रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले असून, या रुग्णांवर मुंबई येथील बालाजी व वोक्हार्ट इस्पितळांमध्ये महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया होणार आहे.

ठळक मुद्दे७८ विद्यार्थ्यांवर होणार मुंबईत शस्त्रक्रिया

अकोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत २०१७-१८ मध्ये अंगणवाडी व शाळा तपासणीच्या वेळी आढळलेल्या संशयित हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची हृदय शस्त्रक्रिया पूर्वतपासणी (टू डी ईको शिबिर)चे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे ३० व ३१ आॅक्टोबर रोजी करण्यात आले आहे. या शिबिरात १६६ हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची टू डी ईको चाचणी करण्यात आली. यापैकी ७८ रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले असून, या रुग्णांवर मुंबई येथील बालाजी व वोक्हार्ट इस्पितळांमध्ये महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया होणार आहे.या टू डी ईको तपासणी शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. डी. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.या शिबिरात मुंबई येथील बालाजी हॉस्पिटलचे डॉ. भूषण चव्हाण व डॉ. पंकज शहा यांनी १६६ हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची टू डी ईको चाचणी केली. यापैकी ७८ रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले. ३५ विद्यार्थ्यांना सहा महिन्यांनी पुन्हा तपासणीकरिता सूचित करण्यात आले. चार विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करणे शक्य नाही, तर उर्वरित ४९ हृदयाचा आजार नसल्याचे निदान झाले आहे. शिबिरात ७८ रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले असून, या रुग्णांवर मुंबई येथील बालाजी व वोक्हार्ट इस्पितळांमध्ये महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच शस्त्रक्रियेकरिता हृदयरुग्ण विद्यार्थ्यासोबत दोन पालक यांची अकोला ते मुंबई ने-आण करण्याची मोफत व्यवस्था जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत करण्यात येणार असून, २० नोव्हेंबरपासून शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी सहकार्य केले. 

टॅग्स :Healthआरोग्य