शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात नेमले जाणार १.६३ लाख विशेष कार्यकारी अधिकारी

By admin | Updated: March 17, 2016 02:20 IST

राज्य शासनाने नियुक्तीचे निकष बदलले; दर हजार लोकसंख्येमागे होणार दोन नियुक्त्या.

सुनील काकडे / वाशिमएक हजार लोकसंख्येमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी, या पूर्वीच्या नियमात बदल करून, यापुढे हजार लोकसंख्येमागे दोन विशेष कार्यकारी अधिकारी नेमले जाणार आहेत. १६ जानेवारी २0१६ रोजीच्या अंतिम मतदार यादीनुसार राज्यभरात लवकरच एक लाख ६३ हजार २७८ विशेष कार्यकारी अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्य शासनाने १५ मार्च रोजी विशेष कार्यकारी अधिकार्‍यांच्या नियुक्तीसंदर्भातील सुधारित निकष निश्‍चित केले. यापूर्वी जिल्हानिहाय दर हजार लोकसंख्येमागे एक अधिकारी, याप्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात पुनर्विचार करुन शासनाने आता जिल्हानिहाय दर हजार लोकसंख्येमागे दोन विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्याचे निश्‍चित केले आहे. १६ जानेवारी २0१६ रोजीच्या अंतीम मतदार यादीच्या आधारे राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण १ लाख ६३ हजार विशेष कार्यकारी अधिकार्‍यांची नेमणूक केली जाणार आहे. विदर्भातील नागपूर जिल्ह्यात ७ हजार ४९२, भंडारा १ हजार ८४१, गोंदिया २ हजार ९, गडचिरोली १ हजार ४३९, चंद्रपूर ३ हजार ५४७, यवतमाळ ४ हजार ४३, बुलढाणा ३ हजार ७६६, अकोला २ हजार ८४८, वाशिम १ हजार ८१४, अमरावती ४ हजार ३९५ आणि वर्धा जिल्ह्यात २ हजार १0६ विशेष कार्यकारी अधिकार्‍यांची नेमणूक केली जाणार आहे. दर हजार लोकसंख्येमागे २, या निकषाचे तंतोतंत पालन करुन कुठेही अधिक विशेष कार्यकारी अधिकारी नेमले जावू नयेत, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने राज्यभरातील जिल्हाधिकार्‍यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.