शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

१६ हजार हेक्टर शेतीचा घसा कोरडाच!

By admin | Updated: January 11, 2016 01:57 IST

मूर्तिजापूर तालुक्यातील तीनही प्रकल्प मागील सात वर्षांपासून पांढरा हत्ती ठरले.

गणेश मापारी /मूर्तिजापूर:मूर्तिजापूर तालुक्यातील जमिनीसह खारपाणपट्टय़ातील जमीन सिंचनाखाली यावी, याकरिता उभारण्यात आलेले तीनही प्रकल्प मागील सात वर्षांपासून पांढरा हत्ती ठरले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही शेतकर्‍यांच्या शेतात पाणी न पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव जनमंच शोधयात्रेच्या मोहिमेदरम्यान उजेडात आले आहे.विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यात उमा बॅरेज प्रकल्प, घुंगशी बॅरेज मध्यम प्रकल्प आणि काटेपूर्णा बॅरेज प्रकल्प असे तीन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या तीनही प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर खारपाणपट्टय़ातील काही गावांसह मूर्तिजापूर तालुक्यातील एकूण १६ हजार ४0३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा हजारो शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. परंतु, तीनही प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण झालेले नाहीत. सदर प्रकल्प रखडल्याने जनमंच सिंचन शोध यात्रेच्या वतीने रविवारी संबंधित तीनही प्रकल्पावर शोध यात्रा काढण्यात आली. या प्रकल्पांच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असून, अद्याप एकाही प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे काम पूर्ण होण्याचा कालावधी तीनही प्रकल्पांनी ओलांडला आहे. जनमंच सिंचन शोध यात्रेच्या चमूने तिन्ही प्रकल्पांची पाहणी करून शेतकरी व अधिकारी यांचा संवाद घडवून आणला. या संवादामध्ये अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या. शेतकर्‍यांना सिंचनाची सोय त्वरित व्हावी, यासाठी जनमंच प्रयत्न करणार असल्याचे जनमंचचे अध्यक्ष अँड. अनिल किलोर, प्रा. शरद पाटील यांनी सांगितले. अशी आहे तीन मुख्य प्रकल्पांच्या कामाची स्थितीउमा बॅरेज प्रकल्प हा प्रकल्प तापी खोर्‍यात पूर्णा नदीची उपनदी असलेल्या उमा नदीवर प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचे काम २00९ पासून सुरू झाले असून, २३७.२३ कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पासाठी मंजूर आहे. मे. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अँन्ड टीबीपीआर इन्फ्रा प्रोजेक्ट लि.(जेव्ही) या कंपनीस प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. सदर कंपनीने काम बंद केल्यामुळे या कंत्राटदारास ७ नोव्हेंबर २0१४ पासून ३१ ऑगस्ट २0१५ पर्यंत प्रतिदिन ५0 हजार रुपये आणि १ सप्टेंबरपासून एक लाख रुपये प्रतिदिन या प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे दंडाची वसुली करण्यात आली नसून, अद्यापही प्रकल्पाचे काम बंद आहे.काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पकाटेपूर्णा बॅरेज प्रकल्प मंगरूळ कांबे या गावाजवळ प्रस्तावित असून, ३९८.८९ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव या प्रकल्पासाठी सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे संकल्प चित्र मंजूर करण्यासाठी तीन वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लागला आहे. त्यामुळे तीन वर्ष या प्रकल्पाचे काम बंद राहिले. या प्रकल्पाच्या कालव्यासाठी लागणारी जमीन अद्याप घेण्यात आली नाही. सदर प्रकल्प २0१९ पर्यंत पूर्णत्वास येणार असल्याचे संबंधित कार्यकारी अभियंता सांगतात.घुंगशी बॅरेज प्रकल्प खारपाणपट्टय़ातील जमिनीकरिता हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. ३८९.९१ कोटी रुपयांचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकल्पासाठी २७७ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. पाइपलाइनचा प्रस्ताव महामंडळाकडे सादर करण्यात आला असून, भूसंपादनाची प्रक्रियाही थांबलेली आहे. २0१९ पर्यंत शेतकर्‍यांना या प्रकल्पाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.