अकोला : जिल्हा परिषदेतील बदली प्रक्रीयेत शुक्रवारी आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या मिळून १६ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यावेळी सर्व संबंधित अधिकार्यांसह कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत कर्मचार्यांच्या जिल्हा स्तरावर बदल्या करण्यासाठी दोन दिवसांचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. त्यानुसार ११ विभागांतील बदल्या होत आहेत. पहिल्या दिवशी आरोग्य विभाग आणि त्यानंतर शिक्षण विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये आरोग्य विभागातील ६ आरोग्यसेविका, २ आरोग्य पर्यवेक्षक, ४ आरोग्यसेवकांच्या बदल्या झाल्या आहेत. तर शिक्षण विभागातील एका विस्तार अधिकार्याची बार्शिटाकळीतून बाळापूर येथे बदली झाली आहे. ३ केंद्रप्रमुखांच्या पंचायत समिती स्तरावर बदल्या झाल्या. त्यामध्ये कुरणखेड येथील दिलिप सरदार यांची नागठाणा, कुरूम येथील मो. सादिक यांची लोहारा, उरळ येथील सुनंदा भाकरे यांची कुरणखेड येथे बदली झाली आहे. १३ मे रोजी सकाळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागानंतर क्रमाने सामान्य प्रशासन विभाग, पंचायत विभाग, अर्थ विभाग, बांधकाम विभाग, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, लघुसिंचन विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या होणार आहेत. विनंतीनुसार, प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या जातील. सोबतच दिव्यांग कर्मचारी, मतिमंद मुलांचे पालक, हृदय शस्त्रक्रिया झालेले, एकच मूत्रपिंड असलेले, कॅन्सरग्रस्त, सैनिक, अर्धसैनिक जवानाची पत्नी, विधवा, विधवा कर्मचारी, परित्यक्ता, घटस्फोटित महिला, कुमारिका, कर्मचारी यासह नियमात बसणार्या सर्व कर्मचार्यांनी दस्तवेजासह उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी केले आहे.
आरोग्य, शिक्षण विभागातील १६ कर्मचार्यांच्या बदल्या
By admin | Updated: May 12, 2017 19:27 IST