शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५८ कोटीची मदत वितरित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 13:33 IST

तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम लवकरच शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी दुसºया टप्प्यात शासनामार्फत प्राप्त झालेली १५८ कोटी ५४ लाख ८१ हजार रुपयांची मदत शनिवार, १४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम लवकरच शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.पावसाळा संपल्यानंतर अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील १०४ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये जिरायत, बागायत आणि फळ पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी १८ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार पीक नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकºयांना मदत वाटप करण्याच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा मदत निधी शासनामार्फत १९ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला होता. त्यानंतर मदत वाटपाच्या दुसºया टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांसाठी १५८ कोटी ५४ लाख ८१ हजार रुपयांची मदत १३ डिसेंबर रोजी शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. उपलब्ध मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या आदेशानुसार मदतीची रक्कम जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे.तालुकानिहाय रक्कम!जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांसाठी दुसºया टप्प्यात १५८ कोटी ५४ लाख ८१ हजार रुपयांची मदत १४ डिसेंबर रोजी सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुका-३० कोटी ४ लाख ३५ हजार रुपये, बार्शीटाकळी तालुका -१८ कोटी ८२ लाख २२ हजार रुपये, अकोट तालुका-२८ कोटी २५ लाख ६९ हजार रुपये, तेल्हारा तालुका-२० कोटी ४८ लाख ४५ हजार रुपये, बाळापूर तालुका -२२ कोटी ४६ लाख ७१ हजार रुपये, पातूर तालुका-१६ कोटी ८२ लाख ९५ हजार रुपये व मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी २१ कोटी ६४ लाख ४२ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी