अकोला: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सहायक कक्ष अधिकारी पदासाठी रविवार, ३१ जुलै रोजी घेण्यात आलेली पूर्वपरीक्षा १५४२ विद्यार्थ्यांंनी दिली. एकूण अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३३२ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. अकोल्यातील सहा केंद्रांवर घेण्यात आलेली ही परीक्षा शांततेत पार पडली. रविवार, ३१ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत अकोल्यातील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, भारत विद्यालय, जागृती विद्यालय, श्री शिवाजी हायस्कूल मुख्य शाखा व मेहरबानू ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स इत्यादी सहा केंद्रांवर ह्यएमपीएससीह्णची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्हय़ातील १ हजार ८७३ विद्यार्थी अर्ज केले होते. प्रत्यक्षात रविवारी या सहा केंद्रांवर १५४२ विद्यार्थी परीक्षा देण्यास हजर राहिले. उर्वरित ३३१ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत दोन समन्वय अधिकारी, २८ पर्यवेक्षक, ९१ समवेक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.
१५४२ विद्यार्थ्यांनी दिली ‘एमपीएससी’ची परीक्षा
By admin | Updated: August 1, 2016 01:10 IST