शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीसाठी १५ हजार शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:40 IST

अकोला: राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये वर्ग-३ च्या एका पदाचा आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी एका उमेदवाराला तब्बल १५ हजार रुपये शुल्क भरण्याची वेळ शासनाने आणली आहे.

- सदानंद सिरसाटअकोला: राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये वर्ग-३ च्या एका पदाचा आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी एका उमेदवाराला तब्बल १५ हजार रुपये शुल्क भरण्याची वेळ शासनाने आणली आहे. ही बाब गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली. बेरोजगार, आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील विद्यार्थ्यांना परीक्षेपासूनच दूर ठेवण्याच्या षड्यंत्राविरोधात अकोल्यातील उमेदवार एकवटले आहेत. गुरुवारी या मुद्यावर त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांच्या व्यस्ततेमुळे त्यांना उद्या शुक्रवारी बोलाविण्यात आले.ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांमार्फत पदभरतीच्या जाहिराती ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे, मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केल्या. २६ मार्च ते १६ एप्रिल या काळात अर्ज स्वीकारण्याची आॅनलाइन प्रक्रिया सुरू केली. जिल्हा परिषदांच्या जाहिरातीमध्ये एका पदासाठी एकच अर्ज करण्याची अट आहे. एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास उमेदवारी रद्द करण्याचेही नमूद आहे. या माहितीने उमेदवारांचा गोंधळ उडाला. काही उमेदवारांनी याबाबत महापरीक्षा पोर्टलच्या संपर्क क्रमांकावर विचारणा केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार उमेदवाराला एका पदासाठी कितीही अर्ज करता येतील. त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेचे शुल्क स्वतंत्रपणे द्यावे लागेल. ही बाब ग्रामविकास विभागाच्या २४ आॅगस्ट २०१७ रोजीच्या निर्णयातही नमूद आहे. भरतीची जाहिरात आणि निर्णयातील तफावतीने उमेदवार भांबावलेले आहेत. उमेदवारांनी एका पदासाठी ठरावीक जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केल्यास कमीत कमी ७ हजार ते १७ हजार रुपये शुल्काचा भुर्दंड पडत आहे. ज्यांच्याकडे शुल्क भरण्याची ऐपत नाही, त्यांना एक किंवा दोनच जिल्हा परिषदेचा अर्ज भरून परीक्षा देण्याची वेळ शासनाने आणली आहे. ही बाब ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात मांडली. त्यामुळे बेरोजगार, आर्थिक कमकुवत गटातील विद्यार्थ्यांना परीक्षेतून आधीच बाद करण्याचे षड्यंत्र असल्याची भावना उमेदवारांमध्ये निर्माण झाली. त्यावर तोडगा निघेल, या आशेने उमेदवारांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. ती होऊ शकली नाही.- रिक्त १३ पदांसाठी पात्र एका उमेदवाराला ४४२ परीक्षाजिल्हा परिषदेच्या पदभरतीमध्ये रिक्त १३ पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवाराने प्रत्येक पदासाठी ३४ जिल्हा परिषदांमध्ये स्वतंत्र अर्ज केल्यास त्याला ४४२ परीक्षा द्याव्या लागतील. त्याचे शुल्क २ लाख २१ हजार रुपये भरावे लागणार आहे. हा कमालीचा गोंधळ घालण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी