शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटींच्या बँक घोटाळयातील आरोपींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 18:48 IST

दिड कोटी रुपयांच्या घोटाळयातून सदर १७ आरोपींची जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली.

अकोला - कौलखेड चौकातील सेंट्रल बँक आॅफ इंडीयाच्या शाखेत दोन कोटींच्या ठेवीवर दीड कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीररीत्या वाटप केल्याचा ठपका तत्कालीन बँक मॅनेजरसह १७ आरोपींवर ठेवण्यात आला होता. या दिड कोटी रुपयांच्या घोटाळयातून सदर १७ आरोपींची जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली.अजगर मुल्ला फकरुद्दीन आणि शरीन अजगर यांच्या कौलखेड येथील सेंट्रल बँकमध्ये एकत्रीत असलेल्या एफसीएनआर डीपॉझीट रिसीप्ट दोन कोटींच्या ठेवीवर तत्कालीन बँक मॅनेजर मनोहर रामटेके यांनी दिड कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणाला बेकायदेशीर तसेच बनावट दस्तोवेज असतांनाही मान्यता दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. हे कर्ज प्रकरण मंजुर झाल्यानंतर नागपूर येथील आरोपी डॉ. रविंद्र जिकार याने ही रक्कम केजीका हर्बल नावाच्या खात्यामध्ये वळती केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही दीड कोटी रुपयांची रक्कम दिल्ली येथील रविसिंग सिंधु, पुण्यातील पंकज मंत्री, हैद्राबाद येथील नरसिंगदास बाहेती, नागपूर येथील महेश सावळकर, संजय वैराळे यांच्यासह १७ आरोपींच्या खात्यात वळती करण्यात आली होती. सदर कर्ज प्रकरण हे सेंट्रल बँक आॅफ इंडीयाच्या नियम व कायदे पायदळी तुडवून बनावट दस्तावेज सादर करुन, बनावट स्वाक्षºया तसेच फोटोही दुसºयाचे वापरुन तत्कालीन बँक मॅनेजर मनोहर रामटेके व त्यांच्या १६ साथीदारांनी संगनमताने हा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. बँकेचे तत्कालीन झोनल मॅनेजर शरद देशपांडे यांनी विभागीय चौकशी करून या प्रकरणाची तक्रार केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागाकडे केली. सीबीआयचे तपास अधिकारी एस. के. नायर यांनी सखोल तपास करून १७ आरोपींच्या विरुध्द जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.या प्रकरणात सीबीआयच्या वकीलांनी ५६ साक्षीदार तपासले. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश डी पी शिंगाडे यांच्या न्यायालयाने १७ आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपी पंकज मंत्री, नरसिंगदास बाहेती व विष्णू बाहेती यांच्यावतीने अ‍ॅड प्रविण चिंचोले यांनी तर मनोहर रामटेके यांची बाजु अ‍ॅड. दिलदार खान यांनी मांडली. डॉ. रविंद्र जिकार यांची बाजु अ‍ॅड. दिनेश खुरानीया यांनी मांडली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय