शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात पोस्ट कोविडच्या १५ मुलांना ‘सिग्निफिकंट हार्ट डिसिज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:22 IST

अकोला : कोरोनातून बरे झाल्यानंतर मोठ्यांसह लहानग्यांनाही पोस्ट काेविडचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अकोल्यातील १५ मुलांमध्ये ...

अकोला : कोरोनातून बरे झाल्यानंतर मोठ्यांसह लहानग्यांनाही पोस्ट काेविडचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अकोल्यातील १५ मुलांमध्ये सिग्निफिकंट हार्ट डिसिज उद्भवल्याची, तर दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याव्यतिरिक्त एका मुलाला पॅरालिसिसची समस्याही उद्भवल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पालकांनो मुलांना कोरोना होऊन गेला असेल तर त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

लहान मुलांची प्रतिकारशक्ती उत्तम असल्याने त्यांना कोरोनापासून किंवा कोरोनामुक्तीनंतरही धोका नाही, असा समज असेल तर सतर्क व्हा. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. लक्षणांवर वेळीच उपचार न घेतल्यास कोविडमुक्तीनंतर कावासाकी सिंड्रोम हा पोस्ट कोविड आजार होण्याचा धोका असतो. मध्यंतरी मुंबई, नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी कावासाकीचे रुग्ण आढळले होते. अकोल्यातही सुमारे ६०पेक्षा जास्त लहान मुलांमध्ये पोस्ट कोविडचे रुग्ण आढळून आले. यातील बहुतांश मुलांना किरकोळ समस्या उद्भवल्या होत्या, मात्र १५ मुलांना सिग्निफिकंट हार्ट डिसिज उद्भवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच उपचारादरम्यान दोन मुलांचा मृत्यू झाल्याचेही बालरोग तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या रुग्णांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार झाले असून, बहुतांश बालरुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याव्यतिरिक्त सर्वोपचार रुग्णालयात दोन बालरुग्णांवर उपचार झाल्याची माहिती आहे. यापैकी एका रुग्णाला पॅरालिसिसची समस्या, तर दुसऱ्या रुग्णाला अंगावर पुरळची समस्या उद्भवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. उपचारानंतर दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

६० चिमुकल्यांचे झाले इको

मध्यंतरी शहरातील एका खासगी बालरुग्णालयात पोस्ट कोविडच्या ६० चिमुकल्यांचे इको करण्यात आले. यापैकी सुमारे १५ चिमुकल्यांना ‘सिग्निफिकंट हार्ट डिसिस’ असल्याची माहिती समोर आली आहे, तर उर्वरित ४५ चिमुकल्यांना किरकोळ समस्या हाेत्या. उपचारानंतर या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीदेखील डॉक्टरांनी दिली आहे.

अनेकांच्या डाटाची नोंद नाही

प्राप्त आकडेवारी ही केवळ हृदयाशी निगडित पोस्ट कोविड बालरुग्णांची आहे, मात्र कावासाकीसदृश इतरही लक्षण असणाऱ्या पोस्ट कोविड बालरुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. या बालकांच्या आजाराची तीव्रता कमी असल्याने त्यांची नोंदच झाली नसल्याची माहिती आहे. बालकांना असणारा संभाव्य धोका लक्षात घेता, ही नोंद घेणे आवश्यक आहे.

पालकांनी एकदम घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र कोरोना होऊन गेल्यावर मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनातून बरे झालेल्या मुलांना अंगावर चट्टे, पुरळ, डोळे लाल होणे यांसारख्या समस्या उद्भवल्यास तत्काळ बालरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.

- डॉ. विनीत वरठे, विभागप्रमुख, बालरोग विभाग, जीएमसी, अकाेला

पोस्ट कोविडच्या सुमारे ६० बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यापैकी १५ बालकांना सिग्निफिकंट हार्ट डिसिज असल्याचे समाेर आले. त्यांच्यावर यशस्वी उपचार झाले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुलं कोरोनातून बरे झाल्यानंतरही पालकांनी त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

- डॉ. विशाल काळे, बालरोग तज्ज्ञ.