शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

१४६ कृषी सेवा केंद्रांना कारणे दाखवा नोटिस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:19 IST

अकोला : कृषी विभागामार्फत अनुदानावर हरभरा बियाणे वाटपातील घोटाळा प्रकरणात जिल्हा परिषद कृषी विकास अधिकार्‍यांनी जिल्हय़ातील १४६ कृषी सेवा केंद्रांना १८ ऑगस्ट रोजी कारणे दाखवा नोटिस बजावल्या असून, दहा दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे.

ठळक मुद्देहरभरा बियाणे वाटप घोटाळा दहा दिवसांत मागितला खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कृषी विभागामार्फत अनुदानावर हरभरा बियाणे वाटपातील घोटाळा प्रकरणात जिल्हा परिषद कृषी विकास अधिकार्‍यांनी जिल्हय़ातील १४६ कृषी सेवा केंद्रांना १८ ऑगस्ट रोजी कारणे दाखवा नोटिस बजावल्या असून, दहा दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सन २0१६-१७ च्या रब्बी हंगामात कृषी विभागामार्फत जिल्हय़ातील शेतकर्‍यांना अनुदानावर हरभरा बियाणे वाटप करण्यात आले. महाबीज, कृभको व राष्ट्रीय बीज निगम हरभरा बियाणे वाटप करण्यात आले. ३0 किलो हरभरा बियाण्याच्या प्रतिबॅगवर ७५0 रुपयेप्रमाणे अनुदानावर शेतकर्‍यांना वाटप करण्यात आलेल्या बियाणे वाटपात घोळ झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे करण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने जिल्हय़ात अनुदानावर वाटप करण्यात आलेल्या हरभरा बियाणे वाटपातील घोळाची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत चौकशी करण्यात आली. या चौकशीचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गत जुलैमध्ये जिल्हा परिषद कृषी विभागाला प्राप्त झाला. चौकशी अहवालाच्या आधारे अनुदानावरील हरभरा बियाणे विक्री करणार्‍या जिल्हय़ातील १४६ कृषी सेवा केंद्रांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी १८ ऑगस्ट रोजी दिला. नोटिस मिळाल्यापासून दहा दिवसांत खुलासा सादर करण्याचा आदेशही कृषी विकास अधिकार्‍यांनी कृषी सेवा केंद्रांना बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिसमध्ये दिला आहे.

‘या’ तीन मुद्यांवर खुलासा सादर करण्याचे निर्देश!अनुदानावरील हरभरा बियाणे वाटपात बियाणे न मिळालेल्या शेतकर्‍यांची यादी, बियाणे वाटपात अर्धवट बियाणे मिळालेले शेतकरी आणि बियाणे वाटपाच्या चौकशीमध्ये भेट न झालेल्या शेतकर्‍यांची यादी इत्यादी तीन मुद्यांच्या माहितीसह खुलासा सादर करण्याचे निर्देश कृषी विकास अधिकार्‍यांनी कृषी सेवा केंद्रांना बजावलेल्या नोटिसमध्ये दिले.

खुलासा मुदतीत सादर करा, अन्यथा कारवाई!बियाणे घोटाळा प्रकरणात संबंधित तीन मुद्यांवर विहित मुदतीत खुलासा सादर करण्यात यावा, विहित मुदत खुलासा सादर न केल्यास संबंधितांविरुद्ध पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही कृषी सेवा केंद्रांना कारणे दाखवा नोटिसद्वारे देण्यात आला आहे.

अनुदानावरील हरभरा बियाणे वाटपातील घोळासंबंधी प्राप्त चौकशी अहवालानुसार, जिल्हय़ातील १४६ कृषी सेवा केंद्रांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आल्या असून, दहा दिवसांत खुलासा सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.-हनुमंत ममदे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.