शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१४२८ नापास विद्यार्थी देणार बारावीची सप्लिमेंटरी परीक्षा

By नितिन गव्हाळे | Updated: May 26, 2024 21:32 IST

परीक्षा १६ जुलैपासून: कला शाखेचे सर्वाधिक विद्यार्थी

अकोला: राज्य मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीचा प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २७ मे ते ७ जून आणि विलंब शुल्कासह ८ ते १२ जून यादरम्यान भरता येणार असल्याचे विभागीय शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील १ हजार ४२८ विद्यार्थी नापास झाले आहेत. या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.

बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात कला शाखेच्या ७ हजार ८६६ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ८९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत; तर ९६९ विद्यार्थी नापास झाले आहेत. विज्ञान शाखेच्या १३ हजार ५७० पैकी १३ हजार २५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, केवळ ३२० विद्यार्थी नापास झाले आहेत, तर वाणिज्य शाखेच्या २ हजार ८५ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ९४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. केवळ १३९ विद्यार्थी नापास झाले आहेत.

बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि सर्व विषय घेऊन बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेंतर्गत जुलै, ऑगस्ट २०२४ आणि फेब्रुवारी-मार्च २०२५ या लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील. पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेतली जाणार आहे. त्यासाठी राज्य मंडळाने परीक्षेसंदर्भातील परिपत्रक शुक्रवारी जाहीर केले आहे.

या तारखेपर्यंत करा अर्जराज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार, विद्यार्थ्याचे अर्ज दिलेल्या मुदतीत महाविद्यालयांनी ७ जूनपर्यंत चलनाद्वारे शुल्क बँकेत भरायचे आहे. तसेच १८ जूनला महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करायच्या आहेत. अर्ज भरण्याच्या तारखांमध्ये आता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :examपरीक्षाAkolaअकोला