शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१४० नवदाम्पत्यांना लग्नात दत्तक दिले रोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 14:56 IST

अकोला : नवविवाहित दाम्पत्यांना संसारोपयोगी भेटवस्तूंसह शुभेच्छा देण्याची पारंपरिक पद्धत रूढ आहे; मात्र या पारंपरिक पद्धतीला अकोल्यातील शिवसेनेचे नगरसेवक आणि मित्रमंडळीने फाटा देत वृक्ष लागवडीचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

- संजय खांडेकरअकोला : नवविवाहित दाम्पत्यांना संसारोपयोगी भेटवस्तूंसह शुभेच्छा देण्याची पारंपरिक पद्धत रूढ आहे; मात्र या पारंपरिक पद्धतीला अकोल्यातील शिवसेनेचे नगरसेवक आणि मित्रमंडळीने फाटा देत वृक्ष लागवडीचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत या मंडळीने अकोला परिसरातील विविध लग्नसमारंभात जाऊन १४० नवदाम्पत्य यांना भेटवस्तू म्हणून रोप दत्तक देऊन आगळी-वेगळी सामाजिक बांधीलकी जोपासत आहे.साडेतीन वर्षांपूर्वी मलकापूर पंचायत समिती सदस्य असताना काळे आणि त्यांच्या मित्रमंडळीने परिसरात ६५०० रोपांची लागवड केली. रोप लागवडीनंतर पाणी देणे, ऊन, वारा आणि जनावरांपासून जपण्याची व संवर्धनाची जबाबदारी परिसरातील नागरिकांवर सोपविली; मात्र या रोपांकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याने हजारो रोप अकाली जळाले. यातील केवळ ३००० रोप जगलीत. त्यानंतर काळे मित्र मंडळींनी वृक्ष लागवडीच्या मोहिमेत बदल केला. लग्नात जाऊन नवदाम्पत्यांना रोप देण्याची अभिनव पद्धत सुरू केली. त्याचे कौतुकाने स्वागत झाल्याने ही मोहीम सुरू आहे. आतापर्यंत १४० जोडप्यांना रोप देण्यात आलीत. दरवर्षी मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभ होतात. लग्नसोहळ्यातील नवदाम्पत्यांना एक रोप दत्तक म्हणून दिले जाते. रोपाच्या संवर्धनाची जबाबदारीही त्यांच्यावर टाकली जाते. अनेकांनी रोपांची जपवणूक केल्याचे आशादायी चित्र दिसत आहे.वृक्षतोडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने अकोला जिल्ह्याचे तापमान ४७ सेल्सिअस अंशाच्या पार जात आहे. सूर्य सातत्याने आग ओकत असल्याने अकोलेकरांना घराच्या बाहेर निघणे कठीण होत आहे. अकोल्याची ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी वृक्ष लागवडीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. वृक्ष लागवडीच्या या सामाजिक कार्यात मंगेश काळे आणि त्यांची मित्र मंडळी थोडा का होईना, खारीचा वाटा उचलत आहेत.-वृक्ष लागवडीच्या अनेक मोहीम मध्येच बंद पडतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे लागवडीनंतर त्या रोपाच्या संवर्धनाची जबाबदारी कु णी स्वीकारत नाही, हा माझा स्वानुभव आहे. जर रोप दत्तक दिले, तर त्या रोपाच्या लागवडीपासून तर संवर्धनापर्यंतची जबाबदारी व्यक्ती स्वीकारतात.-मंगेळ काळे, शिवसेना नगरसेवक, मलकापूर-अकोला.रोप दत्तक उपक्रमाचे शिलेदारविवाह समारंभातील नवदाम्पत्यास रोप दत्तक देण्याच्या उपक्रमासाठी एक नर्सरी सुरू केली आहे. यामध्ये आंबा, आवळा आणि शोभिवंत फुलांच्या रोपांचा समावेश आहे. रोप दत्तक उपक्रमासाठी मंगेश काळेंसह प्रमोद धर्माळे, केदार खरे,जनार्दन राऊत, अजिंक्य वाघ, सागर भदे, अविनाश मोरे, अविनाश साबळे, प्रफुल्ल आडे, संदीप ढोले, राजू मिश्रा, अतुल राठोड, रोहित काळे, मुन्ना भागडे, सतीश डांगे, सतीश मदनकर, विलास शिंदे व जय पाटील परिश्रम घेत आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोला