शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
2
भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'!
3
मुलगी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
4
४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ
5
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास
6
"आमदार टिंगरे कोणाच्या सांगण्यावरुन पोलीस ठाण्यात गेले? अजित पवारांची नार्को टेस्ट करा"; अंजली दमानियांची मागणी
7
“संजय राऊतांमुळे शरद पवारांनी ठाकरे गटाला आपलेसे केले, आता ही अवस्था झाली”; शिंदे गटाची टीका
8
पूर्व तिमोर देश कोणता? बांगलादेशचे तुकडे करून वेगळा देश निर्माण करण्याचा कट; शेख हसीनांच्या दाव्याने खळबळ
9
IPL गाजवणाऱ्या स्टार भारतीय खेळाडूची हिस्ट्री लीक; स्टार किड्सबद्दल काय केलं सर्च?
10
डॉ. तावरेंच्या शिफारसीबाबत अखेर टिंगरेंचे स्पष्टीकरण; म्हणाले,"मी लोकप्रतिनिधी असल्याने..."
11
“राज्यात भाजपाविरोधी लाटेचे चित्र दिसले, पण सांगलीत तर...”; रोहित पाटील यांचा मोठा दावा
12
लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले
13
ENG vs PAK : इंग्लंडच्या धरतीवर बाबरची सटकली; पाकिस्तानी कर्णधार अन् चाहत्यामध्ये जुंपली
14
Arvind Kejriwal : "प्रेमाने मागितलं असतं तर एखाद-दुसरी जागा दिली असती, पण..."; केजरीवालांची अमित शाहांवर टीका
15
जगप्रसिद्ध पण पुण्यात बदनाम झालेल्या पोर्शे कारच्या टीमने डेटा मिळविला; बिल्डर 'बाळा'ची कुंडली मिळणार...
16
"मी काय मूर्ख नाही, भाजपच मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका
17
१५० भारतीयांची फसवणूक, प्रसिद्ध युट्यूबर बॉबी कटारियाला अटक, किती कोटींचा मालक?
18
"आधी मी ५-१० रूपयांसाठी तरसायचो आता...", रिंकूची 'मन की बात', रोहितचे कौतुक
19
IPL 2024 : सोशल मीडियावर कोणाचा कल्ला? धोनी आणि मुंबई इंडियन्सचा जलवा कायम!
20
RBI नंतर LIC भरणार सरकारी खजाना, ₹३,६६२ कोटींचा डिविडेंड देण्याची केली घोषणा

पाेलिस उपनिरीक्षकासह अंमलदाराला १४ दिवसांची काेठडी

By आशीष गावंडे | Published: April 25, 2024 10:01 PM

‘सीआयडी’कडून दाेन फरार आराेपींचा शाेध

अकाेला: अकाेट पाेलिस ठाण्यात पाेलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या गणेश गाेवर्धन हरमकार या युवकाच्या मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या पाेलिस उपनिरीक्षक राजेश जवरे व अंमलदार चंद्रप्रकाश साेळंके या दाेघांची पाेलिस काेठडी संपल्याने त्यांना गुरुवारी राज्य अन्वेषण विभागाने (सीआयडी) न्यायालयात हजर केले असता, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी भानुप्रताप चव्हाण यांनी दाेन्ही आराेपींना १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली. दरम्यान, याप्रकरणी आणखी दाेन फरार आराेपींचा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून शाेध घेतल्या जात आहे. 

काेणताही गुन्हा दाखल न करता अकाेट पाेलिस स्टेशनमधील पाेलिस उपनिरीक्षक राजेश जवरे, अंमलदार चंद्रप्रकाश साेळंके यांसह आणखी दाेन जणांनी १५ जानेवारी राेजी गाेवर्धन गणेश हरमकार (२७)रा.अकाेट या युवकाला व त्याचे काका सुखदेव हरमकार यांना ताब्यात घेऊन बेदम मारहाण केली हाेती. पाेलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच गाेवर्धनचा अकाेल्यातील खासगी रुग्णालयात १७ जानेवारी राेजी मृत्यू झाल्याचा आराेप करीत सुखदेव हरमकार यांनी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गाेऱ्हे यांच्याकडे तसेच अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक रामनाथ पाेकळे यांच्याकडे तक्रार केली हाेती.

या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पाेलिस उपनिरीक्षक राजेश जवरेसह अंमलदार चंद्रप्रकाश साेळंके या दाेघांचे तडकाफडकी निलंबन केले. तसेच १६ एप्रिल राेजी पोलिस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात अकोट पोलिस स्टेशनमध्ये भादंविच्या कलम ३०२, ३४ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला हाेता. त्याच दिवशी सदर प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे साेपविण्यात आले. 

आराेपींना ८ मे पर्यंत काेठडीया प्रकरणाचा तपास ‘सीआयडी’च्या उपअधीक्षक दिप्ती ब्राम्हणे करीत आहेत. गुरुवारी उपराेक्त दाेन्ही आराेपींची पाेलिस काेठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, इतर दाेन फरार आराेपी अद्याप निष्पन्न झाले नसल्याचे ‘सीआयडी’च्यावतीने नमुद करण्यात आले. आरोपी विरुध्द साक्ष पुरावे, तांत्रिक पुरावे गोळा करावयाचे असल्याने आरोपीना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी ‘सीआयडी’ने केली. सरकार पक्षाच्यावतीने सरकारी विधीज्ञ जयकृष्ण गावंडे यांनी बाजू मांडली. त्यावर न्यायालयाने आराेपींना ८ मे पर्यंत न्यायालयीन काेठडी सुनावली.

 

टॅग्स :PoliceपोलिसAkolaअकोला