शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद : ‘जनसुविधां’चे १३.५० कोटी मिळाले; पण आचारसंहितेत थांबली कामे !

By संतोष येलकर | Updated: March 26, 2024 19:29 IST

जिल्ह्यातील १५८ विकासकामांच्या ‘वर्क ऑर्डर’ बाकी

अकोला: जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेत जिल्ह्यातील ‘जनसुविधां’च्या विविध विकासकामांसाठी जिल्हा परिषदेला १३ कोटी ५० लाख ४८ हजार रुपयांचा निधी मिळाला असला तरी, उपलब्ध निधीतून प्रस्तावित १५८ विकासकामांचे कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) अद्याप बाकी आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने नवीन कामे सुरू करता येणार नसल्याने, जिल्ह्यातील ‘जनसुविधां’ची कामे थांबल्याचे वास्तव आहे. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेत २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील लहान व मोठ्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील विविध जनसुविधांच्या कामांसह तीर्थक्षेत्र व यात्रास्थळांच्या विकासकामांसाठी मंजूर १३ कोटी ५० लाख ४८ हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तीन टप्प्यांत २६ मार्चपर्यंत जिल्हा परिषदेला प्राप्त झाला.

परंतु उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील प्रस्तावित १५८ विकासकामांचे कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता १६ मार्चपासून लागू करण्यात आली असून, आचारसंहिता कालावधीत नवीन विकासकामांच्या ‘वर्क ऑर्डर’ काढता येणार नसून, नवीन कामे सुरू करता येणार नाहीत. त्यामुळे निधी उपलब्ध असला तरी, आचारसंहितेत जिल्ह्यातील ‘जनसुविधां’ची कामे अडकल्याचे चित्र आहे.

‘जनसुविधां’च्या १५८ कामांसाठी असा आहे प्राप्त निधी !जिल्ह्यातील लहान ग्रामपंचायतींतर्गत मंजूर ९८ विकासकामांसाठी ८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी आणि मोठ्या ग्रामपंचायती अंतर्गत २ विकासकामांसाठी २६ लाख ५८ हजार रुपयांचा निधी प्राप्त आहे. जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व यात्रास्थळांच्या ५८ विकासकामांसाठी ४ कोटी ७८ लाख ९० हजार रुपयांचा निधी प्राप्त आहे.

..अशी आहेत प्रस्तावित विकासकामे !‘जनसुविधा’अंतर्गत जिल्ह्यात लहान व मोठ्या ग्रामपंचायती अंतर्गत रस्ते, ग्रामपंचायत भवन, स्मशानभूमी सुविधा, पेव्हर ब्लाॅक, पथदिवे तसेच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी रस्ते, पिण्याचे पाणी, पेव्हर ब्लाॅक आदी विविध विकासकामे प्रस्तावित आहेत.पंचायत समित्यांना निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !जनसुविधांतर्गत जिल्ह्यातील प्रस्तावित विविध विकासकामांसाठी प्राप्त निधी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांना वितरित करण्याची प्रक्रिया २६ मार्चपासून सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAkolaअकोला