शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पायदळ दींडीत जाण्यास मनाई केल्याचा राग मनात धरून १३ वर्षीय मुलाने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 18:52 IST

तेल्हारा : श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त मुंडगाव येथील मंदिरात दर्शनासाठी पायदळ वारीत जाण्यास कुटुंबियांनी मनाई केल्याचा राग मनात धरून तेल्हारा तालुक्यातील अकोली (रुपराव) येथील एका १३ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार, ७ फेब्रुवारी रोजी घडली.

ठळक मुद्देअकोली रुपराव येथील श्रीकृष्ण ढोकणे यांच्या १३ वर्षीय ओम याने मंगळवारी त्याच्या कुटुंबियांकडे मुंडगाव येथे पायदळ वारीत जाण्याची परवाणगी मागितली.परंतु घरच्यांनी त्याला मुंडगाव येथे जाण्यास मनाई केली. यामुळे ओम कालपासूनच नाराज होता. याचा राग मनात धरून ओमने त्याच्या घराच्या बाजूला असलेल्या गायवाड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.

तेल्हारा (जि. अकोला) : श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त मुंडगाव येथील मंदिरात दर्शनासाठी पायदळ वारीत जाण्यास कुटुंबियांनी मनाई केल्याचा राग मनात धरून तेल्हारा तालुक्यातील अकोली (रुपराव) येथील एका १३ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार, ७ फेब्रुवारी रोजी घडली. ओम श्रीकृष्ण ढोकणे असे या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे प्रकट दिनाच्या दिवशी गावावर शोककळा पसरली आहे.श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन ७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र मोठ्या भक्तीभावात साजरा केला जात आहे. प्रकट दिनानिमित्त मुंडगाव येथील संत गजानन महाराज पादुका संस्थान येथे अनेक भाविक दर्शनासाठी जात असतात.

अकोली रुपराव येथील श्रीकृष्ण ढोकणे यांच्या १३ वर्षीय ओम याने बेलखेड येथे ७ फेब्रुवारीला साजºया होणाºया संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सवात सहभागी होण्यासाठी पायदळ जाण्याचा हट्ट ६ फेब्रुवारी रोजी धरला होता; परंतु घरच्या लोकांनी त्याला बेलखेडला पायदळ जाऊ दिले नव्हते. यामुळे ओम कालपासूनच नाराज होता. दरम्यान, बुधवारी सकाळी घरच्यांनी त्याला शाळेत जाण्यास सांगितले. परंतु, कालच्या प्रकाराने व्यथित झालेल्या ओमने शाळेत जाण्यास नकार दिला. यामुळे घरच्यांनी ओमला खडसावले. याचा राग मनात धरून ओमने त्याच्या घराच्या बाजूला असलेल्या गायवाड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच घरच्या मंडळींनी ओमला तातडीने तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ओम हा घरात सर्वात लहान व लाडाचा होता. त्यामुळे घरच्यांना त्याच्या मृत्यूने फार मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मुत्यूने आकोली (रूपराव) गावावर शोककळा पसरली आहे. ओमच्या मित्रांना व शिक्षकांनासुद्धा त्याच्या अशा मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणTelharaतेल्हारा