शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हय़ातील १३ ठाणेदारांच्या बदल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:08 IST

अकोला : जिल्हा पोलीस दलातील तब्बल १३ पोलीस अधिकार्‍यांची खांदेपालट गुरुवारी करण्यात आली. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी या बदल्यांचा आदेश दिला असून, बर्‍याच कालावधीनंतर पहिल्यांदा अशाप्रकारे अभ्यासपूर्ण बदल्या करण्यात आल्याची चर्चा पोलीस वतरुळात सुरू आहे.

ठळक मुद्देअभ्यासपूर्ण बदल्या करण्यात आल्याची चर्चा पोलीस वतरुळात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा पोलीस दलातील तब्बल १३ पोलीस अधिकार्‍यांची खांदेपालट गुरुवारी करण्यात आली. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी या बदल्यांचा आदेश दिला असून, बर्‍याच कालावधीनंतर पहिल्यांदा अशाप्रकारे अभ्यासपूर्ण बदल्या करण्यात आल्याची चर्चा पोलीस वतरुळात सुरू आहे.अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार छगनराव इंगळे यांची पदोन्नती झाल्यामुळे संवेदनशिल असलेल्या अकोट शहरची मोठी जबाबदारी खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांच्यावर देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातून आलेले व अभ्यासपूर्ण पोलिसिंगसाठी नाव असलेले संतोष महल्ले यांच्यावर खदान पोलीस स्टेशनची जबाबदारी देण्यात आली आहे. जुने शहरचे ठाणेदार गणेश अणे यांचा आर्थिक गुन्हे शाखेत चांगला अभ्यास असल्याने त्यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली असून, जुने शहर पोलीस स्टेशनचा अभ्यास असलेल्या विनोद ठाकरे यांच्याकडे जुने शहर पोलीस स्टेशनचा कारभार देण्यात आला आहे. अकोट ग्रामीणचे ठाणेदार पी. जे. अब्दागिरे यांना पोलीस कल्याण देण्यात आले असून, मानाचे ठाणेदार व पदोन्नती झालेले मिलिंद बाहाकार यांना अकोट ग्रामीणची जबाबदारी देण्यात आली. जिल्हा विशेष शाखेचे प्रमुख देवराव खंडेराव यांना पातूर पोलीस स्टेशनची जबाबदारी देण्यात आली आहे. तेल्हार्‍याचे ठाणेदार अनिल ठाकरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून, सचिंद्र शिंदे यांना तेल्हारा ठाणेदारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष शाखेची जबाबदारी दत्तात्रय आव्हाळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. विकास देवरे यांची हिवरखेड ठाणेदारपदी नियुक्ती करण्यात आली असून, जुने शहरचे भाऊराव घुगे यांना माना पोलीस स्टेशनची जबाबदारी देण्यात आली आहे. विशाल नांदे यांची सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दुय्यम अधिकारी, तर नंदकिशोर नागलकर यांची जुने शहर पोलीस स्टेशनला दुय्यम अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तब्बल चार वर्षांच्या कालावधीनंतर एवढय़ा पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी आता कामाचा धडाका सुरू केल्याचे यावरून दिसून येत आहे.