शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ उपाययोजनांसाठी १२.७८ कोटी वितरित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 10:48 IST

१२ कोटी ७८ लाख ७७ हजार रुपयांचा निधी ६ जुलैपर्यंत जिल्ह्यातील यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्याच्या उपाययोजनांसाठी शासन आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) १३ कोटी ७५ लाख ७७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, त्यापैकी १२ कोटी ७८ लाख ७७ हजार रुपयांचा निधी ६ जुलैपर्यंत जिल्ह्यातील यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी शासन आणि प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांकरिता शासनामार्फत आपत्ती प्रतिसाद निधीतून जिल्ह्यासाठी ३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला, तसेच जिल्हा नियोजन समितीमार्फत ९ कोटी ९५ लाख ७७ हजार रुपये असा एकूण १३ कोटी ७५ लाख ७७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. उपलब्ध निधीपैकी ६ जुलैपर्यंत १२ कोटी ७८ लाख ७७ हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित यंत्रणांना विविध उपाययोजनांच्या कामांसाठी वितरीत करण्यात आला आला आहे. उर्वरित ९७ लाख रुपयांचा निधी सद्यस्थितीत जमा आहे.

विभागनिहाय असा आहे वितरित निधी! जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांकरिता १२ कोटी ७८ लाख ७७ हजार रुपयांचा निधी संबंधित विभागांना वितरीत करण्यात आला आहे. त्यामध्ये शासनाच्या आपत्ती प्रतिसाद निधीमधून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला १ कोटी व जिल्हा नियोजन समितीमार्फत १ कोटी ८७ लाख ३ हजार रुपये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आपत्ती प्रतिसाद निधीतून ३५ लाख रुपये व जिल्हा नियोजन समितीमार्फत ४ कोटी ४७ लाख ११ हजार रुपये, आपत्ती प्रतिसाद निधीतून जिल्ह्यातील सातही तहसीलदार कार्यालयांना ८१ लाख रुपये,जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला १५ लाख रुपये, महानगरपालिका आयुक्त कार्यालयाला ५० लाख रुपये, तेल्हारा नगरपालिकेला १ लाख रुपये, बार्शीटाकळी नगरपंचायतला १ लाख रुपये आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाला ३ कोटी ६१ लाख ६३ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्याच्या उपाययोजनांसाठी शासनाच्या आपत्ती प्रतिसाद निधीमधून आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध निधीपैकी आतापर्यंत १२ कोटी ७८ लाख ७७ हजार रुपयांचा निधी संबंधित यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे.-संजय खडसेनिवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या