शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

१२०० कोरकू मजूर ‘लॉकडाउन’मुळे मेळघाटातच! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:29 IST

२१ मार्चपासून ‘लॉकडाउन’ झाल्याने हे मजूर अकोल्यात आले नाहीत.

- संजय खांडेकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला एमआयडीसीत काम करणारे १२०० कोरकू मजूर ‘लॉकडाउन’मुळे मेळघाटातील त्यांच्या गावीच अडकले आहेत. हे सर्व मजूर होळीसाठी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच गावाकडे गेले होते. दरम्यान, २१ मार्चपासून ‘लॉकडाउन’ झाल्याने हे मजूर अकोल्यात आले नाहीत. जे काही आले ते फारच कमी असून, त्यांच्या भरवशावर अकोल्यातील २० टक्के उद्योग सुरू झाले आहेत.अकोला एमआयडीसीत डाळ आणि आॅइल मिल्सची संख्या इतर उद्योगांच्या तुलनेत जास्त आहे. दोन्ही उद्योग जीवनावश्यक बाबींमध्ये येत असल्याने जिल्हा प्रशासनाने या उद्योगांना सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे; मात्र हे उद्योग सुरू करताना मजूर वर्गाची समस्या भेडसावित आहे. एमआयडीसीतील दोन्ही उद्योगांमध्ये ७० टक्के मजूर आदिवासी कोरकू आहेत. अमरावतीच्या जंगल परिसरात राहणाºया या समाजाला रोजगार नसल्याने हा मोठा वर्ग अकोल्यात येतो. १५०० च्या घरात कोरकू मजूर एमआयडीसीत कामाला असतो. संपूर्ण कुटुंब वर्षभर एकत्र राहतात. ९ आणि १० मार्च रोजी असलेल्या होळी सणानिमित्त हे सर्व मजूर वर्ग महिन्याच्या सुरुवातीलाच मेळघाटातील गावाकडे गेले होते. कोरोना महामारीचा प्रकोप सुरू झाल्याने २१ मार्चपासून राज्यात ‘लॉकडाउन’ झाले. त्यामुळे अकोल्यात येणारे १२०० कोरकू मजूर सुदैवाने मेळघाटातच राहिले. जे काही ३०० मजूर अकोल्यात आले आहेत, त्याच्या आणि स्थानिक काही मजुरांच्या भरवशावर अकोल्यातील २० टक्के उद्योग सुरू झाले आहेत. अकोल्यातून तूर डाळ, चणा डाळ आणि तेल मोठ्या प्रमाणात बाहेर पाठविल्या जात आहे.

परप्रांतातील लोक अकोला एमआयडीसीत फार कमी आहेत. मध्य प्रदेश आणि काही उत्तर प्रदेशचे लोक यामध्ये आहे. इतर सर्व ट्रक चालक-वाहक आहेत. उद्योजकांच्या गोदामामध्ये आणि खोल्यांमध्येच समूहाने राहणाºयांची व्यवस्था आहे. कोरोनासारखी लक्षणे दिसताच आम्ही आरोग्य अधिकाºयांना पाचारण करतो.-रामेश्वर चव्हाण, निरीक्षक, एमआयडीसी अकोला.

दाल मिल, आॅइलसारखे जीवनावश्यक वस्तूंमधील उद्योग सुरू आहेत. स्थानिक आणि काही मेळघाटातील मजूर या ठिकाणी आहे. ‘सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाझरच्या वापरासंदर्भात त्यांना सांगितले जाते. कोरोनासारखी लक्षणेदिसताच आरोग्य विभागातील अधिकाºयांना येथे पाचारण केले जाते.-उन्मेश मालू, अध्यक्ष, एमआयडीसी अकोला.

टॅग्स :Akola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळLabourकामगारAkolaअकोला