शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधून आलेले १२० मजूर पकडले; दोन ट्रकमध्ये कोंबून सुरू होता प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 16:31 IST

बिडगाव फाट्यावर दोन्ही पकडले असता अनेक लोक त्या ट्रक मधून कोंबून एकत्र प्रवास करताना आढळून आले.

ठळक मुद्देदोन ट्रक मधून १२० लोकांना कोंबून नेण्यात येत होते.वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची तपासणी करण्यात आली आहे.त्यांना दहातोंडा येथील शाळेत ठेवण्यात आले आहे.

मूर्तिजापूर : देश कोरोना विषाणुच्या प्रभावाखाली असताना गुजरात मधून अनेक लोकांना ट्रकमध्ये कोंबून वाहतुक सुरू असल्याचा प्रकार ३१ मार्च रोजी कारंजा रोडवर बिडगाव फाटा नजीक मूर्तिजापूर ग्रामीण पोलीसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. दोन ट्रक मधून १२० लोकांना कोंबून नेण्यात येत होते.या सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांना दहातोंडा येथील शाळेत ठेवण्यात आले आहे.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य तसेच जिल्हा बंदी असतानाही एका ठिकाणाहून दुसरीकडे शेकडो लोक चोरुन एकत्र प्रवास करीत आहेत. संचारबंदी दरम्यान मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी कर्त्तव्यावर असताना समोरून जाणाऱ्या दोन ट्रक बाबत त्यांना संशय आला. त्यांनी त्या ट्रकचा पाठलाग करून बिडगाव फाट्यावर दोन्ही पकडले असता अनेक लोक त्या ट्रक मधून कोंबून एकत्र प्रवास करताना आढळून आले.अहमदाबाद गुजरात येथून ट्रक क्रमांक एमएच ४० बीएल ०४०१ व एमएच ४० बीए ५७५६ यामध्ये महिला व बालकांसह १२० लोकांना एकत्र कोंबून कारंजा, दिग्रस व धुळे कडे नेत असताना कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार गजानन झोपे व अश्विन चव्हाण यांनी पाठलाग करुन बिडगाव फाट्यावर पकडले. या दरम्यान तिसरा ट्रक पसार झाल्याची माहिती आहे. कोंबून आणलेल्या लोकांची तात्पुरती निवासाची व्यवस्था दहातोंडा येथील शाळेत करण्यात आली असून त्याच ठिकाणी त्यांची तपासणी करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, ठाणेदार रहीम शेख, नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ यांनी भेट दिली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी )ट्रक मधून आलेल्या मजुरांच्या निवासाची व्यवस्था दहातोंडा येथील आश्रमशाळेत करण्यात आली आहे. इतर व्यवस्था येथील स्वयंसेवी संस्थेमार्फत करण्यात येत आहे. आतापर्यंत लोकांची तपासणी झाली आहे. यापूढे वरील आदेश येईपर्यंत त्यांना इथेच ठेवण्यात येणार आहे.अभयसींह मोहिते,उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर

 

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस