शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

१२ लाखांचे धनादेश जनता बँकेतून गायब!

By admin | Updated: April 17, 2017 01:54 IST

सिटी कोतवालीत तक्रार, वटविण्यासाठीचे धनादेश गायब केल्याने खळबळ

अकोला - अकोला जनता कमर्शियल को-आॅपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या रयत हवेलीजवळ असलेल्या मुख्य शाखेतून तब्बल १२ लाख रुपयांचे चार धनादेश गहाळ करण्यात आले आहेत. या प्रकरणाची तक्रार खातेदाराने सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. रतनलाल प्लॉट येथील रहिवासी अनुप निरंजनकुमार डोडिया यांचा दलालीचा व्यवसाय आहे. या दलालीच्या व्यवसायाचे त्यांचे अकोला जनता बँकेत रिषभ मार्केटींग आणि दुसरे जी. एम. ट्रेडिंग या दोन नावाने चालू खाते गत १० वर्षांपासून असून, या दोन्ही खात्याचे प्रोप्रायटर अनुप डोडिया आहेत. डोडिया यांनी गौरव अशोक शर्मा व त्यांच्या जय गजानन ट्रेडिंग कंपनीला पैसे पुरविले होते. अनुप डोडिया यांना गौरव अशोक शर्मा व त्यांच्या जय गजानन ट्रेडिंग कंपनीने चार धनादेश दिले होते. यामध्ये पहिला धनादेश क्रमांक ००००८३ हा १० एप्रिल रोजी अनुप डोडिया यांनी त्यांच्या जनता बँकेतील बचत खाते क्रमांक ३०७५५ मध्ये वटविण्यासाठी लावला होता. त्यानंतर याच तारखेत अनुप डोडिया प्रोप्रायटर असलेल्या जी. एम. ट्रेडिंगच्या नावे असलेल्या ६७०० क्रमांकाच्या चालू खात्यात १ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश क्रमांक ००८९८९ वटविण्यासाठी दिला. हा धनादेश अ‍ॅक्सीस बँकेचा होता. त्यानंतर रिषभ मार्केटिंगच्या चालू खात्यात १ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश क्रमांक ००८९९० आणि दोन लाख रुपयांचा धनादेश क्रमांक ०७३३७९ वटविण्यासाठी लावण्यात आले होते. याची पावतीही बँकेच्या स्वाक्षरी आणि शिक्क्यासह देण्यात आली. मात्र, धनादेश वटला नाही. खात्यात जमा न झाल्याने ते बँकेत विचारण्यासाठी गेले असता, जनता बँकेच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर डोडिया यांनी ‘रिटर्न मेमो’ मागितले, ते बँकेने दिले नाहीत. धनादेश परत मागितले असता बँकेच्या अधिकाऱ्यांनी धनादेश गहाळ झाल्याचे सांगितले. त्यामुळे डोडिया यांनी प्रकरणाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. जनता बँकेतील मुख्य शाखेतील एका शिपायाच्या चुकीमुळे सदर चार धनादेश दुसऱ्याच व्यक्तीला देण्यात आले आहेत. सदर धनादेश शोधण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र, शिपायाच्या चुकीने हे चारही धनादेश दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आले असल्याने या प्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे. हा प्रकार चुकीने घडला आहे. सदर व्यक्ती धनादेश बँकेत आणूण देणार आहे.-अनिल लटुरिया,शाखा व्यवस्थापक, जनता बँक मुख्य शाखा.