लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणांत तातडीने मदत देण्याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांची १२ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, नऊ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली.जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत अकोला जिल्हय़ातील एकूण २१ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी शेतकरी आत्महत्यांची १२ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. त्यामध्ये पातूर तालुक्यातल्या चान्नी येथील ज्ञानेश्वर विश्वनाथ राखोंडे, बाश्रीटाकळी तालुक्यातल्या पार्डी येथील प्रमोद मनोहर काकड, अकोट तालुक्यातल्या आंबोडा येथील महेंद्र विनायक राऊत, तेल्हारा येथील पुष्पा नथ्थुजी घ्यार, हिवरखेड येथील अकिलखा मन्नानखा, बाळापूर तालुक्यातल्या अडोशी येथील अभिमन्यू मुकिंदा गावंडे, बाश्रीटाकळी तालुक्यातल्या खेर्डा येथील संजय तुळशीराम इंगळे, अकोट तालुक्यातल्या पणज येथील महेंद्र रामराव राजुरकर, देऊळगाव येथील रामदास महादेव बोदडे, अकोला तालुक्यातल्या कौलखेड गोमासे येथील विनोद ज्ञानदेवराव काटे, तेल्हारा तालुक्यातल्या भांबेरी येथील केशव रामदास राऊत व बाश्रीटाकळी तालुक्यातल्या पाटखेड येथील साहेबराव महादेव खंडारे इत्यादी १२ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहेत, तर उर्वरित शेतकरी आत्महत्यांची नऊ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. अपर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला समितीचे सदस्य डॉ.बाबूराव शेळके, शिवाजीराव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था )जी.जी.मावळे, सहायक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाघमारे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अकोला जिल्हय़ातील शेतकरी आत्महत्यांची १२ प्रकरणे मदतीसाठी पात्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:50 IST
अकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणांत तातडीने मदत देण्याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांची १२ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, नऊ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली.
अकोला जिल्हय़ातील शेतकरी आत्महत्यांची १२ प्रकरणे मदतीसाठी पात्र!
ठळक मुद्देनऊ प्रकरणे मदतीसाठी अपात्र!शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली जिल्हास्तरीय समितीची बैठक