शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापक गैरहजर राहिल्यास अकरावीत प्रवेश प्रक्रिया रद्द!

By admin | Updated: April 18, 2017 01:48 IST

शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा : आॅनलाइन अकरावी प्रवेशाबाबत बुधवारी सभा

अकोला : शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेश केंद्रीय पद्धतीने आॅनलाइन करण्यात येणार आहेत. या विषयावर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापकांची बुधवारी सभा आयोजित केली आहे. या सभेला प्राचार्य, मुख्याध्यापक गैरहजर राहिल्यास त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाला इयत्ता अकरावीचे प्रवेशित विद्यार्थी दिल्या जाणार नाहीत, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिला आहे. इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने आॅनलाइन करण्यासाठी यापूर्वी सभा घेण्यात आली होती. या सभेमध्ये आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी संमतिपत्र व कनिष्ठ महाविद्यालयांची संपूर्ण माहिती विहित प्रपत्रामध्ये मागितली होती; परंतु शहरातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी अद्यापपर्यंत विहित प्रपत्रामध्ये माहिती सादर केली नाही. या शैक्षणिक सत्रामध्ये मनपा क्षेत्रातील इयत्ता अकरावी प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्याचे निश्चित केल्यामुळे १९ एप्रिल रोजी रालतो विज्ञान महाविद्यालय येथे सकाळी ९ वाजता सभा घेण्यात येणार आहे. इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्यासाठी शहरातील अनुदानित, विनाअनुदानित, कायमविना अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांनी सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. सभेमध्ये आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात येणार आहे. सभेला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक गैरहजर राहिल्यास त्यांच्या महाविद्यालयात अकरावी प्रवेशित विद्यार्थी दिले जाणार नाहीत, असा इशारा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी दिला आहे.