शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

११६६ घरकुलांना १७ कोटी मंजूर

By admin | Updated: June 7, 2014 23:54 IST

आकोट : पालिकेद्वारे राबविण्यात येणार्‍या रमाई आवास योजनेंतर्गत ११६६ घरकुलांना शासनाकडून हिरवी झेंडी मिळाली असून, यासाठी तब्बल १६ कोटी ८५ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने रमाई आवास लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.

आकोट : पालिकेद्वारे राबविण्यात येणार्‍या रमाई आवास योजनेंतर्गत ११६६ घरकुलांना शासनाकडून हिरवी झेंडी मिळाली असून, यासाठी तब्बल १६ कोटी ८५ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने रमाई आवास लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणार्‍या रमाई आवास योजनेंतर्गत आकोट पालिकेने सन २०११-१२ मध्ये दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले होते. त्यानंतर शासनाच्या आदेशावरून सन २०१२-१३ साठी नवीन उद्दिष्ट पाठविण्यात आले. त्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील ५९० आणि दारिद्र्यरेषेवरील ५०६ लाभार्थींचा समावेश होता. परंतु या उद्दिष्टासाठी निधीच नसल्याने हे सारे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पडून होते. बराच कालावधी होत असल्याने याबाबत लाथार्थींची मोठ्या प्रमाणात ओरड होती; परंतु प्रत्येकवेळी निधी अनुपलब्धतेचे कारण पुढे केले जात होते. अशा स्थितीत माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे यांनी राज्याचे समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे यांना हा प्रश्न निकाली काढण्याची गळ घातली. त्यासाठी नामदार मोघे यांनी आकोट पालिकेशी बैठक आयोजित केली. या बैठकीला माजी राज्यमंत्री गणगणे, नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया, मुख्याधिकारी समीर लाठी, संजय अढाऊ, लिपिक किशोर एडणे हे उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये आकोट पालिकेद्वारे राबविलेल्या योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर विशेष बाब म्हणून आकोट पालिकेच्या ११६६ प्रस्तावांना मंजुरात देण्यात आली. या घरकुलांसाठी लागणारा १६ कोटी ८५ लाख ६४ हजारांचा निधी येत्या जूनमध्ये पालिकेस देण्यात येणार आहे. या मंजुरातीमुळे रमाई आवास योजनेच्या लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी).......