शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद उपकर योजनेसाठी ११२८ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:22 IST

बाळापूर : जिल्हा परिषद उपकर योजनेंतर्गत ९० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य वाटप करण्यात येते. या योजनेसाठी तालुक्यातून १३५५ अर्ज ...

बाळापूर : जिल्हा परिषद उपकर योजनेंतर्गत ९० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य वाटप करण्यात येते. या योजनेसाठी तालुक्यातून १३५५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी अर्जाची छाननी केल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता न करणारे ४४० अर्ज हे अपात्र ठरवून ११२८ अर्जाची यादी पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे पाठविली आहे. पंचायत समितीकडे अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची सूचना फलकावर लावणे गरजेचे होते ; मात्र पंचायत विभागाने तसे न केल्यानेच ४४० अर्ज अपात्र ठरल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे. जिल्हा परिषदने उपकर योजना सेस फंड मार्फत शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर साहित्य वाटपासाठी पात्र लाभार्थींसाठी अर्ज मागविले होते. शेतकऱ्यांना कागदपत्रांची सूची माहीत नसल्याने अर्ज सादर केले. शेतात विहीर, बोअरवेल नसताना एच.डी. पाईपसाठी अर्ज करणारे ६० अपात्र ठरले, तर अपंग दाखला नसूनही अपंग प्रवर्गात अर्ज करणारे अपात्र ठरले.

----------------------------------------------

तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनुदानावर साहित्य मिळवण्यासाठी पंचायत समितीकडे अर्ज केले. आवश्यक कागदपत्रांची यादी सूचना फलकावर लावणे गरजेची आहे. शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी माहिती नसल्याने अर्ज घेताना ते तपासून घेतले असते, तर ४४० अर्ज अपात्र ठरले नसते. प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकरी वंचित राहणार आहेत. -सागर उपर्वट, सरपंच ग्रा. पं. शेळद.

---------------

यापुढे कुठलेही अनुदान साहित्य वाटप करण्यापूर्वी अर्ज घेताना आवश्यक कागदपत्रांची सूचना फलकावर यादी व आवश्यकता भासल्यास अर्जाची तपासणी करुनच अर्ज स्वीकारले जातील. - अरुण मुंदडा, कृषी अधिकारी पंचायत समिती बाळापूर.

----------------

लाभासाठी असे केले अर्ज

जिल्हा परिषदेच्या उपकर योजना ९० टक्के अनुदानावर सर्वसाधारण शेतकऱ्यांनी प्लास्टिक ताडपत्रीच्या लाभासाठी अपंग १४ पात्र, सर्वसाधारण शेतकरी ६५४ पात्र, तर २२८ अपात्र अर्ज, एचडी पाईपसाठी २६४ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी १६९ पात्र अपंग ०२, अपात्र ९३. सोयाबीन सेपरेटर १९५ अर्ज शेतकऱ्यांनी केले, त्यापैकी अपंगांसाठी पात्र १६, सर्वसाधारण पात्र ११९, तर अपात्र ६०. बॅटरी ऑपरेटेड पाॅवर स्पेसाठी २६५ शेतकऱ्यांनी अर्ज केले, त्यापैकी अपंगांसाठी १३ अर्ज, सर्वसाधारण पात्र १८६, अपात्र ६६. असे एकूण १,१२८ पात्र अर्जांची यादी मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठवली आहे.