शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

११ सेतू केंद्र संचालकांना ‘शो कॉज’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:03 IST

अकोला : कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात दिरंगाई करणार्‍या जिल्हय़ातील ११ सेतू केंद्र संचालकांना बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कारणे दाखवा नोटीस (शो कॉज) बजावण्यात आली असून, ७ सप्टेंबर रोजी खुलासा सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

ठळक मुद्देकर्जमाफी : ऑनलाइन अर्ज भरण्यात दिरंगाईकारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेले असे आहेत सेतू केंद्र संचालक!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात दिरंगाई करणार्‍या जिल्हय़ातील ११ सेतू केंद्र संचालकांना बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कारणे दाखवा नोटीस (शो कॉज) बजावण्यात आली असून, ७ सप्टेंबर रोजी खुलासा सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) आणि आपले सरकार केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर कर्जमाफीसाठी थकबाकीदार शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात सेतू केंद्रांना येणार्‍या अडचणींचे निवारण आणि केंद्रांविरुद्ध तक्रारींची शहानिशा करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या आदेशानुसार ५ सप्टेंबर रोजी तांत्रिक तज्ज्ञांची तपासणी पथके गठित करण्यात आली. त्यानुषंगाने तपासणी पथकांनी ६ सप्टेंबर रोजी जिल्हय़ातील विविध ठिकाणी सेतू केंद्रांची तपासणी केली असता, कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात अनियमितता आढळून आलेल्या जिल्हय़ातील ११ सेतू केंद्र संचालकांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशानुसार कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. ७ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता जिल्हाधिकार्‍यांसमक्ष उपस्थित राहून खुलासा सादर करण्याचा आदेशही सेतू केंद्र संचालकांना नोटीसद्वारे देण्यात आला आहे.

कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेले असे आहेत सेतू केंद्र संचालक!जिल्हय़ातील ११ सेतू केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला शहरातील राहुल देशमुख, मंगेश पळसपगार, प्रतिभा काटे, मोहन लुले, चोहोट्टा बाजार येथील येथील रितेश सिरसाट, प्रवीण गव्हाळ, अमोल बोरचाटे, पातूर तालुक्यातील माळराजुरा येथील गोपाल शिंदे, पातूर येथील धनराज शिंदे, नंदा तेलगोटे व मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा येथील रोशन ठोकळ इत्यादी सेतू केंद्र संचालकांचा समावेश आहे.

..तर केंद्र बंद करण्याची कारवाई! कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या ११ सेतू केंद्र संचालकांनी ७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांसमक्ष खुलासा सादर न केल्यास संबंधित सेतू केंद्र बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही कारणे दाखवा नोटीसमध्ये देण्यात आला.

तपासणीत आढळली केंद्रांची दिरंगाई!तपासणीत काही सेतू केंद्र बंद आढळून आले, तर काही केंद्रांनी ५ सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीचा ऑनलाइन एकही अर्ज भरून घेतला नाही, तसेच ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत सूचना फलक लावण्यात आले नाही, दरपत्रक (रेटबोर्ड ) लावण्यात आले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित ११ सेतू केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली. -