शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्याच्या ११ कोटींच्या कामाचा हिशेब जुळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 12:50 IST

अकोला: मूलभूत सोयी-सुविधांतर्गत महापालिकेला प्राप्त ४० कोटींच्या निधीतून पाणी पुरवठ्याच्या कामासाठी ११ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

अकोला: मूलभूत सोयी-सुविधांतर्गत महापालिकेला प्राप्त ४० कोटींच्या निधीतून पाणी पुरवठ्याच्या कामासाठी ११ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. संबंधित कामात मोठ्या प्रमाणात अपहार झाला असून, प्रशासकीय पातळीवर कंत्राटदाराचे ३ कोटी ९५ लाखांचे देयक अदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत देयक अदा न करण्याची मागणी भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी गुरुवारी निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाने देयक अदा केल्यास कोर्टात खेचण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.२०१२ ते सप्टेंबर २०१४ पर्यंत महापालिकेत भारिप बहुजन महासंघाची सत्ता होती. त्यावेळी शहरातील मूलभूत सोयी-सुविधांची कामे करण्यासाठी शासनाकडून ४० कोटींचा निधी प्राप्त झाला होता. सदर निधीत मनपाच्या आर्थिक हिश्शाचा समावेश नव्हता. प्रशासनाने जलप्रदाय विभागाला ११ कोटी ८४ निधी दिला होता. त्यामध्ये महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वाळू बदलणे, नवीन पंप खरेदी करण्यासह विविध कामे प्रस्तावित केली होती. मनपात सप्टेंबर २०१४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर माजी महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या कालावधीत पाणी पुरवठ्याच्या कामांना सुरुवात झाली. त्यावेळी सदर काम निकषानुसार होत नसल्याचा आरोप करीत विद्यमान महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाकडे ५२ नगरसेवकांच्या स्वाक्षरीने पत्र सादर केले होते. कंत्राटदाराने विनापरवानगी अतिरिक्त काम करणे, कामात वेळोवेळी बदल करणे तसेच विहित मुदतीत काम पूर्ण न केल्यामुळे प्रशासनाने दंडापोटी आकारलेले ५४ लाख रुपये आदी मुद्यांवर भारिप-बमसंने अनेकदा आक्षेप नोंदविला आहे. याप्रकरणी मोठा अपहार झाल्याचा आरोप गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी केला असून, ११ कोटी ८४ लाखांच्या कामांची सखोल चौकशी केल्यानंतरच देयक अदा करावे, तोपर्यंत देयक न देण्याची मागणी अ‍ॅड. देव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.देयक अदा करण्याची घाई का?मनपातील जलप्रदाय विभागाचा जुना इतिहास आहे. थकीत देयकाच्या संदर्भात अनेकदा पदाधिकाऱ्यांचा इन्टरेस्ट दिसून येतो. ११ कोटी ८४ लाखांच्या निधीतून ३ कोटी ९५ लाखांचे देयक अदा करण्यापूर्वी संबंधित कामांची व सादर केलेल्या देयकाची तपासणी करणे अपेक्षित आहे. या ठिकाणी उलटा प्रकार होत असून, देयक अदा करण्याची घाई केली जात असल्याने शंका-कुशंका निर्माण होत आहेत. याप्रकरणी आयुक्त संजय कापडणीस काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका