शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधून आलेल्या ‘त्या’ मजुरांना पाठविले घरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 17:46 IST

स्कुल बस व काही खासगी वाहनाने नेर, दारव्हा, मंगरूळपीर, दिग्रस मानोरा, कारंजा या गावी घराकडे रवानगी करण्यात आली.

मूर्तिजापूर : देश कोरोना विषाणुच्या प्रभावाखाली असताना गुजरात मधून अनेक लोकांना ट्रकमध्ये कोंबून आणला असल्याचा प्रकार ३१ मार्च रोजी कारंजा रोडवर बिडगाव फाटा नजीक पोलीसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला होता. दोन ट्रक मधून १०८ लोकांना कोंबून नेण्यात येत असताना त्यांना अलगीकरणात आश्रयीत ठेवण्यात आले होते. रविवारी त्यांना त्यांच्या घरी रवाना करण्यात आले.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा त्याचा फैलाव होऊ नये यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरी एका ठिकाणाहून दुसरीकडे शेकडो लोक चोरुन एकत्र प्रवास करीत आहेत. संचारबंदी दरम्यान मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका ट्रकचा पाठलाग करून बिडगाव फाट्यावर पकडले होते. अहमदाबाद गुजरात येथून दोन ट्रक क्रमांक एमएच ४० बीएल ०४०१ व एमएच ४० बीए ५७५६ यामध्ये महिला व बालकांसह १०८ लोकांना एकत्र कोंबून कारंजा, दिग्रस, नेर, दारव्हा, मंगरूळपीर, मानोरा कडे नेत असल्याचे समोर आले होते. पोलीस हवालदार गजानन झोपे व अश्विन चव्हाण यांनी दोन्ही ट्रक पकडले होते. कोंबून आणलेल्या लोकांची आश्रयीत अलगीकरण म्हणून निवासाची व्यवस्था दहातोंडा येथील आश्रम शाळेत करण्यात आली होती. त्याच ठिकाणी त्यांची तपासणी सुद्धा करण्यात करण्यात आली होती. दरम्यान त्यांचा अलगीकरण कालावधी संपुष्टात आल्याने त्यातील १०४ लोकांची १९ एप्रिल रोजी सुटका करुन स्कुल बस व काही खासगी वाहनाने नेर, दारव्हा, मंगरूळपीर, दिग्रस मानोरा, कारंजा या गावी घराकडे रवानगी करण्यात आली. तसेच उर्वरित ४ लोकांना २१ एप्रिल रोजी घरी पाठविण्यात येणार आहे. यात २ ट्रक चालक व एका क्लिनरचा समावेश असून तिघेही नागपूर जिल्ह्यातील रहिवासी व एक व्यक्ती अचलपुर येथील रहिवासी असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिली.   पकडण्यात आलेल्या मजूरांचा अलगीकरणाचा कालावधी संपल्याने व कोरोना संदर्भात त्यांच्यात कुठलीही लक्षणे आढळून आली नसल्याने विशेष परवानगी घेऊन त्यांना मुळ गावी पोहोचविण्यात आले आहे.- प्रदिप पवार,तहसीलदार, मूर्तिजापूर

 

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरLabourकामगारcorona virusकोरोना वायरस बातम्या