शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील १११ गावांसाठी १०३ पाणी पुरवठा योजना मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 12:15 IST

अकोला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १११ गावांसाठी १०३ योजनांची कामे सुरू करण्यास राज्यस्तरीय योजना मंजुरी समितीने मान्यता दिली आहे.

ठळक मुद्देगेल्यावर्षी मंजूर मात्र कामे सुरू न झालेल्या २३ गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांचाही समावेश आहे. पाण्याची सोय करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्राप्त प्रस्तावानुसार योजनांना मंजुरी दिली जाते.

- सदानंद सिरसाटअकोला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १११ गावांसाठी १०३ योजनांची कामे सुरू करण्यास राज्यस्तरीय योजना मंजुरी समितीने मान्यता दिली आहे. त्यामध्ये गेल्यावर्षी मंजूर मात्र कामे सुरू न झालेल्या २३ गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, येत्या काळातील निवडणुकांमुळे मंजूर योजनांची कामे चालू वर्षातही सुरू होतात की नाही, हा प्रश्न यावेळीही उपस्थित होत आहे.गावांमध्ये स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांची निर्मिती करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सुरू आहे. त्या कार्यक्रमातून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्राप्त प्रस्तावानुसार योजनांना मंजुरी दिली जाते. त्यासाठी राज्यस्तरीय योजना मंजुरी समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जातो. त्या समितीची बैठक २९ जून रोजी पार पडली. त्या बैठकीचे इतिवृत्त २४ जुलै रोजी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांना देण्यात आले. त्या बैठकीत अकोला जिल्ह्यातील १११ गावांमध्ये १०३ योजनांची कामे करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामध्ये गेल्यावर्षी समितीने मंजुरी दिल्यानंतर अद्यापही कामे सुरू न झालेल्या २३ नळ पाणी पुरवठा योजनांचाही समावेश आहे. ती कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली गावे!अकोला तालुका : भौरद, बोरगाव, डोंगरगाव, दुधलम, चिखलगाव, चांदूर, खडकी-टाकळी, उगवा, कुरणखेड, कोठारी-ढगा, अमानतपूर, भोड, बोरगाव-डाबकी, बोरगाव मंजू, चांगेफळ, दोडकी, टाकळी पोटे, कळंबेश्वर, कानडी, कानशिवणी, खरप खुर्द, मासा, म्हैसपूर, पातूर नंदापूर-सोनखास, सोनाळा, यावलखेड, कुंभारी.बार्शीटाकळी : जांभरूण, मांगुळ-२, भेंडगाव, देवदरी ३ गावे, चोहोगाव-धामनदरी, जामवसू-खडकी, मांडोली, खोपडी, लोहगड, मोरगाव काकड, परंडा, पिंपळगाव हांडे, पिंजर, राहित, राजनखेड, साखरविरा, साल्पी-वाल्पी, चोहोगाव-सायखेड, चेलका-सेवानगर, सिंदखेड, तिवसा बुद्रूक-तिवसा खुर्द, झोगडा.मूर्तिजापूर : खरब नवले-२, कुरूम, येंडली, वीरवाडा, कोळसरा-पिंगळा, भगोरा, दताळा, किनखेड, कोळसरा, लाखपुरी, मधापुरी, माटोडा-जामठी खुर्द, मुरंबा-तुरखेड, निंभा, समशेरपूर- जितापूर नाकट, खरब ढोरे, सांगवा, शेरवाडी-शेलू वेताळ, शिवण खुर्द, भटोरी, दहातोंडा-गौलखेडी, आरखेड, बोरगाव, गाजीपूर, समशेरपूर, सोनोरी, वाईमाना-अलादतपूर, कानडी.बाळापूर : दधम बुद्रूक, हसनापूर, हातरुण, शेळद, नागद-दगडखेड, नकाशी, सांगवी जोमदेव, टाकळी निमकर्दा-बोराळा, बोरवाकडी, खंडाळा, माणकी, मोरगाव सादीजन, मोरझाडी, रिधोरा, वाडेगाव, बहादुरा.पातूर : पाडसिंगी, गावंडगाव, बोडखा-चिंचखेड, माळराजुरा, मळसूर.

 

टॅग्स :WaterपाणीAkolaअकोला