शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

राज्यात सरासरीच्या १०२ टक्के पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 13:46 IST

अकोला : राज्यात यावर्षी सरासरीच्या १०२ टक्के पाऊस होईल पण, कृषी हवामान शास्त्र मॉडेलनुसार वाºयाचा वेग कमी आढळून आल्याने जून, जुलै तसेच आॅगस्ट महिन्यात सात जिल्ह्यांसह तीन ते चार तालुक्यांच्या ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

ठळक मुद्देजून, जुलै व आॅगस्ट महिन्यात अकोल्यासह पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, निफाड, जळगाव, सिंदेवाही व परभणी येथे पावसाचा मोठा खंड पडेल.पश्चिम विदर्भात अकोला येथे जून ते सप्टेंबरपर्यंत सरासरी ६८३.७ मि.मी., तर याच कालावधीतील साधारण ६५५ मि.मी. ९६ टक्के पाऊस होईल. मध्य विदर्भ विभागात १०२ टक्के पावसाची शक्यता असून, नागपूर सरासरी व साधारण ९५८ मि.मी म्हणजेच १०० टक्के पाऊस होईल.

- राजरत्न सिरसाट

अकोला : राज्यात यावर्षी सरासरीच्या १०२ टक्के पाऊस होईल पण, कृषी हवामान शास्त्र मॉडेलनुसार वाºयाचा वेग कमी आढळून आल्याने जून, जुलै तसेच आॅगस्ट महिन्यात सात जिल्ह्यांसह तीन ते चार तालुक्यांच्या ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली.यावर्षीचा १ जून ते सप्टेबरपर्यंतचा पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे. कमाल तापमान, सकाळ व दुपारची आर्द्रता, वाºयाचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी, या निकषावर त्यांनी हा अंदाज वर्तविला. मान्सून कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल पण, वाºयाचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै व आॅगस्ट महिन्यात अकोल्यासह पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, निफाड, जळगाव, सिंदेवाही व परभणी येथे पावसाचा मोठा खंड पडेल. दापोली, पाडेगाव व नागपूर भागात खंडित वृष्टी राहील. तसेच कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड, असे हवामान राहणार असल्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.दरम्यान, पश्चिम विदर्भात अकोला येथे जून ते सप्टेंबरपर्यंत सरासरी ६८३.७ मि.मी., तर याच कालावधीतील साधारण ६५५ मि.मी. ९६ टक्के पाऊस होईल. मध्य विदर्भ विभागात १०२ टक्के पावसाची शक्यता असून, नागपूर सरासरी व साधारण ९५८ मि.मी म्हणजेच १०० टक्के पाऊस होईल. यवतमाळला सरासरी ८८२, तर साधारण ९२६ मी.मि. १०५ टक्के पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ विभागात १०५ टक्के पावसाची शक्यात असून, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे सरासरी १९९१ मि.मी. साधारण १२ ५० मि.मी. असा १०५ टक्के पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा विभागात १०२ टक्के पावसाचा अंदाज आहे. परभणी येथे सरासरी ८१५ , साधारण ८३१ मि.मी. म्हणजेच १०२ टक्के पावसाची शक्यता आहे. कोकण विभागात १०७ टक्के पावसाची शक्यता आहे, तर दापोली येथे सरासरी ३३३९ मि.मी., तर साधारण ३५९६ मि.मी. १०७ टक्के पाऊस होईल. उत्तर महाराष्टÑात १०३ टक्के पावसाचा अंदाज आहे. यात नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे सरासरी ४३२, तर साधारण ४६० मि.मी. १०६ टक्के, धुळे येथे सरासरी ४८१, तर साधारण ५०० मि.मी. १०३ टक्के पाऊस होईल. जळगाव जिल्ह्यात सरासरी ६३९, तर साधारण ६४० मि.मी. १०० टक्के पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात १०० टक्के अंदाज वर्तविण्यात आला असून, कोल्हापूर सरासरी ७०६ एकूण ७३० मि.मी. १०३ टक्के पावसाचा अंदाज आहे. कराड येथे सरासरी ५७० मि.मी. पाऊस होईल. पाडेगाव सरासरी व साधारण ३६० मि.मी. १०० टक्के, सोलापूर सरासरी ५४३ साधारण ५५० मि.मी. १०० टक्के, राहुरी सरासरी व साधारण ४०६ मि.मी. १०० टक्के, तर पुणे येथे सरासरी ५६६ साधारण ५७८ मि.मी. १०२ टक्के पावसाची शक्यता आहे.

  राज्यात यावर्षी सरासरीच्या १०२ टक्के पावसाची शक्यता आहे पण, वाºयाचा वेग कमी आढळल्याने काही ठिकाणी जून, जुलै व आॅगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे.डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ तथा सदस्य संशोधन परिषद स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

 

टॅग्स :Akolaअकोलाmonsoon 2018मान्सून 2018