शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भीमटेकडी येथील महाप्रसादाच्या कार्यक्रमात शंभर ग्रामस्थांना विषबाधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 18:07 IST

अकोला : अकोट तालुक्यातील हिंगणी येथील भीम टेकडी गावातील १०० ग्रामस्थांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली.

अकोला : अकोट तालुक्यातील हिंगणी येथील भीम टेकडी गावातील १०० ग्रामस्थांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. एकाएकी झालेल्या या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. दरम्यान रुग्णांना गंभीर अवस्थेत सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.प्राप्त माहितीनुसार, अकोट तालुक्यातील हिंगणी भीमटेकडी येथे रविवार १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासोहब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाबासोहबांना आदरांजली वाहल्यानंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास भोजनाला सुरुवात झाली. जेवणानंतर काही वेळातच काही नागरिकांना उलटी झाल्याचा प्रकार घडला. अपचनामुळे हा प्रकार घडला असावा म्हणून इतरांनी दुर्लक्ष केले. परंतु, काही वेळातच इतरांसोबतही हा प्रकार घडल्याने गावात एकच खळबळ उडाली. जवळपास १०० ग्रामस्थांना या जेवणामुळे विषबाधा झाल्याचे उघड झाले असून, सर्वांन्ना तत्काळ अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिस्थितीचे गांभिर्य लक्षा घेत डॉक्टरांनी तत्काळ उपचारास सुरुवात केली. यातील चार पेक्षा जास्त रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. विषबाधेचे नेमके कारण कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. यावेळी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी अपघात कक्षाला भेट देऊन परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी डॉक्टरांनी सिटीकोतवाली पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी सर्वोपचार रुग्णालयात धाव घेत घटनेच्या तपासास सुरुवात केली.रुग्णांसाठी तत्काळ वॉर्डाची निर्मीतीएकाच वेळी शंभरच्या जवळपास रुग्ण आणि मर्यादीत खाटांमुळे अपघात कक्षात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती सावरण्यासाठी अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी स्टाफ रुम व इतर बंद वॉर्डात खाटांची व्यवस्था करुन रुग्णांसाठी वॉर्ड तयार केले.खाटांची संख्या अपुरीसर्वोपचार रुग्णालयात खाटांची अपुरी संख्या ही नेहमीचीच बाब आहे. परंतु, रविवारच्या घटनेमुळे खाटांची कमी प्रकर्षाने दिसून आली.परिस्थिती नियंत्रणात असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विषबाधा नेमकी कशातून झाली. तपासणी अहवालानंतरच ते कळू शकणार.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय